मकर संक्रांतची संपूर्ण माहिती

(Makar Sankrant) दरवर्षी जानेवारी महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते तेव्हा साजरा केला जाणारा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सूर्याचे धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तिला मकर संक्रांत म्हणतात. म्हणजे सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते आणि दिवस हळू-हळू मोठा होऊ लागतो आणि रात्र छोटी होत जाते. या दिवशी ‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ हा संदेश देणाऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांत प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांतला Makar Sankrant खूप महत्व आहे. मकर संक्रांत इंग्लिश दिनदर्शिका प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी दिनदर्शिका प्रमाणे पौष महिन्यात असते. संक्रांत तिथी पौष शुक्ल ६ ला असते. संक्रांतीला तिळाला फार महत्व आहे.

मकर संक्रांती दिनदर्शिका

वर्षदिवसतारीखउत्सव नाव
२०१५बुधवार१४ जानेवारी २०१५मकर संक्रांती
२०१६गुरुवार१४ जानेवारी २०१६मकर संक्रांती
२०१७शनिवार१४ जानेवारी २०१७मकर संक्रांती
२०१८रविवार१४ जानेवारी २०१८मकर संक्रांती
२०१९सोमवार१४ जानेवारी २०१९मकर संक्रांती
२०२०बुधवार१५ जानेवारी २०२०मकर संक्रांती
२०२१गुरुवार१४ जानेवारी २०२१मकर संक्रांती
२०२२शुक्रवार१४ जानेवारी २०२२मकर संक्रांती
२०२३शनिवार१४ जानेवारी २०२३मकर संक्रांती
२०२४रविवार१४ जानेवारी २०२४मकर संक्रांती
२०२५मंगळवार१४ जानेवारी २०२५मकर संक्रांती

महाराष्ट्रातील संक्रांत

महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण ३ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
पहिला दिवस – १४ जानेवारीला भोगी.
दुसरा दिवस – १५ जानेवारीला मकर संक्रांत.
तिसरा दिवस – १६ जानेवारीला किंक्रांत.
प्रत्येक राज्यात या सणाचं महत्व वेगळं-वेगळं आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक राज्यात या सणाला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखले जाते.

इतर राज्यात मकर संक्रांत नाव. Makar Sankrant Name in Other State.

राज्यभारतातील राज्यानुसार उत्सवाचे नाव
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामकरा संक्रमणा, मकरा संक्रांती
आसामभोगली बिहू, माघ बिहू
गुजरातउत्तरायण
गोवासंक्रांत
हरियाणामाघी, सकरात किंवा संक्रांती
हिमाचल प्रदेशमाघी
कर्नाटकसुगी किंवा कापणीचा सण
काश्मीर खोरेशिशूर सेइनक्रांत
महाराष्ट्रमकर संक्रांती, मकर संक्रांत
मिथिलाटीला सकराईत
ओडिसामकरा मेळा, मकरा चौला, मकर संक्रांती
पंजाबमाघी
राजस्थानमकर संक्राती, संक्रात
तामिल नाडूथाई पोंगल
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारखिचडी
वेस्ट बंगालपौष संक्रांती

भोगी

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात भोगी म्हणतात. भोगीच्या दिवशी घर आणि घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. अभ्यंगस्नान करून नवीन कपडे आणि अलंकार परिधान केले जातात. विवाहित स्त्रिया या दिवशी माहेरी येतात. घरातील सर्वजण एकत्र येतात आणि भोगी साजरा करतात.
या दिवशी जेवणात आवर्जून तिळाचा कूट घालून मिश्र भाजी ( शेंंगाभाज्या आणि फळभाज्या ) करतात.
त्याबरोबर तीळ लावलेली भाकरी, पापड, लोणी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत, चटणी आणि मुगाची खिचडी असते. ह्या पदार्थांचे देवाला नैवेद्य दाखवले जाते आणि नंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

किंक्रांत

संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी करतात.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर (किंकर) नावाच्या राक्षसाला (दैत्याला) संक्रांतीदेवीने ठार मारले आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. हा दिवस करिदिन म्हणून ओळखला जातो या दिवशी कोणतेही शुभकार्य (अशुभ दिन) केले जात नाही.

किंक्रातीला काय करू नये?

स्त्रियांनी शेणात हाट घालू नये.

किंक्रातीला काय करावे?

केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी.
हळदी-कुंकू समारंभ करावा.

आहार

संक्रांतीला तिळाला फार महत्व आहे. महाराष्ट्रात ह्या दिवशी तिळ-गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाचे लाडू, तिळाची चटणी, तिळाची वडी, गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवून नंतरतो सर्वाना वाटला जातो.

संक्रांती पूजा

संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया घर आवरून नवीन कपडे, दागिने, नाकात नथ घालून तयार होतात आणि सुगद्याची पूजा (बोळक्याची पूजा) करतात आणि देवासमोर आपल्या संसारासाठी, सुख संपतीसाठी, धन-धान्य कधी कमी पडू नये यासाठी प्रार्थना करतात.

नवविवाहित मुलीला माहेरून काली चंद्रकळा, हळद-कुंकूचा करंडा (कोयरी) दिला जातो. तिळगुळाचे दागिने बनवून तिला परिधान केले जातात आणि जावई बापूंना चांदीच्या वाटीत तीळ-गुळ द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे.

संध्याकाळी हळद-कुंकू समारंभ असतो यामध्ये महिलांना घरी बोलावून हळद-कुंकू अत्तर लावून वाण दिले जातात. यामध्ये बांगड्या, नारळ, आरसा, डिश, वाटी, एखादी स्टीलच्या वस्तू, किंवा फळ वाण आणि त्याबरोबर तीळ-गुळ, एक फुल दिला जातो.

ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून तिळ-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे आणि आपल्यातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. म्हणूनच ह्या दिवशी “तिळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला” अशा शुभेच्छा दिल्या जातात.

“तिळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचं तिळगुळ सांडवू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका “

संध्याकाळी लहान मुल आपल्या शेजार्यांकडे जाऊन तिळगुळ आणि साखर फुटाणे देतात आणि त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात.
तसेच मोठी माणसेपण यामध्ये सहभागी होऊन तिळगुळ आणि साखर फुटाणे देऊन एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देतात.

सुवासीनीना पूजेचं साहित्य

 • पूजेसाठी ५ सुगड (बोळकी, छोटी मडकी)
 • पणती
 • नवा पांढरा दोरा
 • हळद-कुंकू
 • नवीन कपडा
 • तीळ-गुळ
 • ऊस
 • गाजर
 • गव्हाच्या ओंब्या
 • हरभरे दाणे
 • बोर
 • ताम्हन अथवा स्टीलचे ताट
 • दिवा व अगरबत्ती

सुवासीनीना पूजेचा विधी

एका स्टीलच्या ताट घ्या त्यात पाच सुगड घ्या सुगडीना पांढरा दोरा बांधा, त्यांना हळद-कुंकू लावा, त्यामध्ये उसाचे काप, गाजर, तील-गुळ, गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचे दाणे, बोर घाला. नंतरवर एक पणती ठेवा. वरून एक नवीन कापड घालून झाकून ठेवा. त्यासमोर निरांजन, अगरबत्ती लावा. हे करण्या मागचा हेतू असा असतो कि माझ्या संसारात धनधान्य, कपडा-लक्ता कशाची कमी पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये. यानंतर गृहिणी एकमेकांना वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात.

यात्रा

भारतात ठिकठिकाणी संक्रांतीला यात्रा असते
कोलकाता शहराजवळ गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते त्या ठिकाणी गंगासागर यात्रा असते.
या दिवशी हिमालयातील काही भागात जत्रा पण भरते जसे – देवप्रयाग, मुनी की रेती, व्यासघाट, कीर्तीनगर.
या दिवशी केरळमधील शबरीमला डोंगरावर मकरज्योती दर्शनासाठी अनेक भाविकांची गर्दी होते.

मकर संक्रांती शुभेच्छा – Makar Sankrant Marathi Wish

Makar Sankranticha Hardik Shubhecha
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तोंडावर तर सगळेच गोड बोलतात पण पाठी मागुन गोड बोला तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
तोंडावर तर सगळेच गोड बोलतात पण पाठी मागुन गोड बोला तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला
तिळगूळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगूळ सांडू नका आमच्याशी कुणी भांडू नका.
तिळगूळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगूळ सांडू नका आमच्याशी कुणी भांडू नका
आपणा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छया
आपणा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here