150+ Good Night Quotes In Marathi With [HD Images] – शुभ रात्री सुविचार मराठी

Good Night Quotes In Marathi

Download Image

आपल्या परिवाराला, मित्र मैत्रिणींना व प्रेमाला अश्याच प्रकारे आपल्या इतर प्रियजनांना सुंदर असे good night quotes in marathi – शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश आम्ही घेऊन आलो आहोत.

रात्र म्हणजे आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती देणारी हक्काची वेळ.. ह्या वेळेत आपण शांत झोप घेतो व अनेक सुंदर स्वप्न पाहतो. अश्या ह्या सुंदर रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या आयुष्यात असलेल्या आपल्या सोन्यासारख्या प्रियजनांना खुप साऱ्या शुभेच्छा संदेश पाठवत असतो.

असेच खुप सारे शुभ रात्री शुभेच्छा संदेश, फोटो, good night quotes, good night images, good night massage आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

Good Night Quotes In Marathi | गुड नाईट शुभ रात्री मराठी सुविचार

special good night quotes

Download Image

आठवणींचे पांघरून घेऊन झोपूया, एखाद सुंदर स्वप्न आपली वाट पाहत असेल.

!! शुभ रात्री !!

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे झोप जी माणसाला काही काळ दुःखातून मुक्त करते.

Good Night

कणभर सुखासाठी मणभर कष्ट करावे लागतात, तेव्हाच क्षणभर विश्रांती घेता येते.

Good Night

आयुष्य मनमोकळे पणाने जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या… कारण रात्री फुलांना सुद्धा माहित नसतं उद्या स्मशानात जायचं की मंदिरात…!

Good Night…🍁

shubh ratri

Download Image

असं म्हणतात की झोपण्यापूर्वी चांगल्या माणसांची आठवण काढली तर झोप चांगली लागते. म्हणून. “तुमची” आठवण काढली..!

Good Night

रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!

Good Night

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते…

Good Night Sweet Dreams 😴

देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं. कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं.

सुंदर रात्रीच्या… सुंदर शुभेच्छा..

Shubh Ratri Sms Marathi

Download Image

हात आणि साथ योग्य वेळी द्या कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते.

Good Night

हसत, खेळत प्रेमाने रहा आयुष्य पुन्हा नाही सर्वांना साथ द्या, सर्वांची साथ घ्या..

।। शुभ रात्री‌ ।।

आयुष्यात सगळ्याच ईच्छा पूर्ण होतील असं नाही, काही अपूर्ण ईच्छा सुद्धा जगण्याची प्रेरणा देणाऱ्या असतात..

।। शुभ रात्री‌ ।।

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

Good Night

shubh ratri marathi

Download Image

आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीचं लागणार आहे…!!!

Good Night ✨

रात्री झोपायला १२ वाजणे हे आयुष्याचे १२ वाजण्याचं लक्षण आहे !

Good Night

थोडक्यात पण मनापासून शुभ रात्री..🍁

जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको.

Good Night

shubh ratri images

Download Image

झोपण्यापूर्वी कोणी शुभ रात्री म्हटलं तर खरचं बर वाटतं. कोणाला तरी मनापासून आपली आठवण येते ही भावनाच मनाला थोडासा तरी आनंद देऊन जाते. त्यामुळे माझ्या माणसांना मनापासून…

Good Night…✨

स्वभाव आणि विचार चांगले ठेवा DP आणि स्टेटस सगळेच चांगले ठेवतात.

Good Night

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही, साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच…

!! शुभ रात्री !!

आपल्याला जे जे पाहिजे ते ते मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती..

!! शुभ रात्री !!

shubh ratri image

Download Image

मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा येणारच, आणि आपली माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच..

Good Night 🍁

आठवणी या अशा का असतात ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या .. नकळत ओंझळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा .. प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!

शुभ रात्री

दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवून एकदा हसून स्वतःला म्हणा… Good Night 😴

“परमात्म्याची” किमया पहा आपणा सर्वांना “निर्माण” करून स्वतः “अदृश्य” आहे, सर्व पहाण्यासाठी “डोळे” तर दिले पण त्याला पहाण्यासाठी डोळे “बंद” करावे लागतात..!!

शुभ रात्री

Relationship Good Night Messages Marathi

Download Image

आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर संबंधाला.

Good Night..✨

परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात..

Good Night..

आठवण नाही काढली तरी चालेल पण. विसरुन जाऊ नका..

शुभ रात्री..

जगायचे तर दिव्याप्रमाणे जगा, जो राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत एकसारखा प्रकाश देतो.

शुभ रात्री..

positive good night quotes

Download Image

आयुष्य. हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.

Good Night ✨

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तिच असतात, जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतात..

!! शुभ रात्री !!

खरै बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात व खोटं बोलणारा कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्याला उपदेश देणारे जास्त भेटतात.

शुभ रात्री..

Beautiful Good Night Marathi | सुंदर शुभ रात्री मराठी सुविचार व फोटो

love special good night quotes

Download Image

विचारात हरवून जायचं जरी बात क्षुल्लक असते, सर्व पसारा होई विचारांचा तरी रात शिल्लक असते !

!! शुभ रात्री !!

माणसाचा स्वभाव हा केवड्याच्या फुलासारखा असावा… फळ देता येत नसलं म्हणून काय झालं पण सुगंधाने अवघ्या जगाला मोहवून टाकता आलं पाहिजे..

।। शुभ रात्री ।।

मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.

Good Night…

दवबिंदूचे तुषार हे हिरव्या पाणावरच आणि भावना ह्या हळव्या मनावरचं छान दिसत असतात…!!

Good Night

love good night quotes

Download Image

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो.

Good Night 🍁

आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोउन” दिले की आपोप सुटतात..

Good Night..

चांगल्या व्यक्तीने अपमान केला, अथवा रागवली तरी चालेल, पण त्याला सोडु नका.. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत.. पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.. म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा ..

Good Night

माणसाजवळ धन नसलं तरी चालेल.. पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं एक मन नक्की असावं..

Good Night

Love Good Night Images In Marathi

Download Image

सुंदर काय असतं ?

कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पूर्ववत होते. ते नाते सुंदर असते..

🙏🏻 शुभ रात्री‌ 🙏🏻

घर हे झोपडी असो किंवा बंगला जर संस्काराची साथ असेल तर ते मंदीर झाल्याशिवाय राहत नाही.

।। शुभ रात्री‌ ।।

आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा, कधी, कुठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला..!

।। शुभ रात्री‌ ।।

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते.

Good Night

life positive good night quotes

Download Image

पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते, या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते..!

Good Night

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल…!!!

!!शुभ रात्री!!

आज उद्या करता करता आयुष्य संपून जात मनासारख जगायचं तेवढ मात्र राहून जात.

।। शुभ रात्रि ।।

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका… कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!

Good Night 🍁

inspirational good night quotes

Download Image

संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे, जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठं असेल.

!! शुभ रात्री !!

हातातले गेले तरी नशिबातले कधीच कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचे कधी पुरत नाही आणि कष्टाचे कथी संपत नाही…!!

।। शुभ रात्रि ।।

नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या.. कारण, पुर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो..

!! शुभ रात्री !!

आपल्या कामाला कोण आले. यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. तरच जीवनात नक्की यशस्वी व्हाल.

!! शुभ रात्री !!

heart touching good night quotes

Download Image

जीवनात असे काही दिवस येतात माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात पण जी माणसे दूर असूनही आठवण काढतात त्यांना तर खरे आपली माणसे म्हणतात.

सुंदर रात्रीच्या शुभेच्छा…

नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात..
शुभ रात्री..

आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहीत नसतो.. कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो..

Good Night

Good Night Wishes In Marathi | गुड नाईट मराठी

Good Night Wishes In Marathi

Download Image

विचारांचे युद्ध क्षमवण्यासाठी एकांतातील शांतता हवी असते.

Good Night

नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते..

!!शुभ रात्री‌!!

एकांत आवडायला लागला की समजून जायचं.. आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय.

Good Night 🍁

माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते.

Good Night..🍁

Good Night Thought

Download Image

थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडी काळजी आणि थोडीशी विचारपूस… जीवनात आणखी काय हवं..?

!! शुभ रात्री !!

आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं, मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं..

Good Night..✨

परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहतं नाही भाग्य लिहितात ते आपले विचार, व्यवहार आणि कर्म.

!!शुभ रात्री!!

नशिबापेक्षा कर्तुत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही… कर्तुत्वामुळे येते…..!

Good Night

Good Night Thought Marathi

Download Image

अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चाळनीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा.

Good Night..

काळापेक्षा वेळेचं भान ठेवायला जमलं की, हवं ते मिळवण्यासाठी जीवाच रान कराव लागत नाही.

Good Night

दुः ख परक्या समोर मांडू नये, मनातले सारे कुणा सांगू नये, नसतेच कोण कोणाचे इथे साऱ्यांनाच आपले मानू नये…

Good Night ✨

योग्य हाताची ‘साथ’ मिळाली की माणूस योग्य वाटेवर चालतो.

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.

Good Night Thought In Marathi

Download Image

सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरु लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्याने बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे..

शुभ रात्री..

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

!! शुभ रात्री !!

मनापासून जीव लावला तर रानातलं पाखरू सुद्धा आवडीने जवळ येत. आयुष्य एकदाच आहे. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा.

!! शुभ रात्री‌ !!

मन चांगल आणि स्वभाव Royal ठेवा देव आपल्याला काहीच कमी पडु देणार नाही..

🍁 शुभ रात्री 🍁

Good Night Status In Marathi

Download Image

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

!! शुभ रात्री !!

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र, एक मिनिट विचार करून, घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

Good Night ✨

कधी कधी शांतता हि केव्हाही चांगली कारण शब्दानं लोकं नाराज होतात.

Good Night

जीवन जगताना काळजी घेणारं कुणीतरी सोबत असेल तर चार क्षण आणखी जगावंस वाटतं..

🍁 Good Night 🍁

Good Night SMS

Download Image

हे देवा मला माझ्यासाठी काही नको पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे…

Good Night 🤞🏻

मनुष्याच्या शरीरातील सर्वात घातक अवयव म्हणजे कान… महाभारत घडवतो..

!! शुभ रात्रि !!

ठीक आहे आजचा दिवस कठीण होता। पण उद्याची पहाट काहीतरी नवीन घे ऊन येणार आहे.

।। शुभ रात्री‌ ।।

जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती..

Good Night 🍁

Good Night SMS In Marathi

Download Image

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

!! शुभ रात्री‌ !!

वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण, म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.

Good Night 🍁

आठवणीने आठवण काढत आहे, परत म्हणु नका की, आपली माणसं विसरुन जातात.

शुभ रात्री

Funny Good Night Messages | मजेदार शुभ रात्री संदेश

good night quotes

Download Image

उठा उठा सकाळ झाली झोपा झोपा गंमत केली…!

GOOD NIGHT

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय आता मोबाईल तोंडावर पड़ल्या शिवाय नाही कळतं काळजी घ्या दातं-बीतं पडतील.

!!शुभ रात्री!!

रात्र is coming, तारे are chamking, Everyone is zoping, Why are U jaging..? So गो 2 अंथरुण And take पांगरून And घ्या झोपून.😍

Good Night

चांगली झोप लागावी म्हणुन
Good Night

चांगले स्वप्न पडावे म्हणुन
Sweet Dreams

आणि स्वप्न पाहताना बेडवरून पडू नये म्हणुन
Take Care

good night quotes short

Download Image

पापाचा घडा भरला की घडा बाजूला करा आणि ड्रम लावा
.
.
.

कारण तुम्ही सुधारणाऱ्यांमधले नाही.
😂😂😂

फुलाला मनाला कवीला फुल आवडते, मन आवडते, कविता आवडते, कोणाला काही आवडेल आपल्याला काय करायच आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडते😁😁

!! शुभ रात्री !!

झाल का जेवणं मग झोपा आता शुभ रात्री..

तुम्ही काय मेसेज पाठवणार नाही म्हणून मीच पाठवला. शुभ रात्री..

Good Night Images In Marathi | शुभ रात्री फोटो मराठी डाउनलोड

good night quotes marathi

Download Image

साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत.

Good Night…

सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो. कारण हा काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवू शकत नाही.

।।शुभ रात्री‌।।

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.

शुभ रात्री

शाळा सारं काही शिकवते लघुकोन, काटकोन त्रिकोण, चौकोन पण आपलं कोण.. हे मात्र परिस्थितीचं शिकवते..!

Good Night

good night quotes marathi

Download Image

आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे. लोकांना नाही.

Good Night..✨

धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो..

Good Night..

होईल सगळं ठीक फक्त ही वेळ कठीण आहे आयुष्य नाही.

।।शुभ रात्रि।।

तोंडावर स्पष्ट बोलणारी लोकं परवडली पण हसून खोटं बोलणारी नको.

शुभ रात्री

good night quotes for love

Download Image

मनमुरादपणे हसावे माणसाने, स्वछंदी जगाव माणसाने, कितीही वादळे आली आयुष्यात तरी आपल्याच धुंदीत जगाव माणसाने”

।।शुभ रात्री।।

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात..

Good Night

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात..

।।शुभ रात्री।।

जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसुन उठून परत एकदा नव्याने सुस्वात करूशकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानेच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते.

Good Night

good night quotes for friends

Download Image

माणसात समाधानी वृत्ती असेल तर जीवनात आपोआपच सर्व सुख यायला सुरुवात होऊन जाते.

शुभ रात्री…

काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही करणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्या पेक्षा मोठा होऊ शकतो.

Good Night

हरायचं, लढायचं, पडायचं, प्रसंगी बरबाद व्हायचं पण कोणासमोरही झुकायचं न्हाय..

Good Night

मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही; म्हणूनच तर माणूस एकांतात ही रमतो..

Good Night

good night messages

Download Image

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त वाईट परिस्थितीत आपलं अस्तित्व. निर्माण करता आलं पाहिजे…

Good Night

लहानपणी उन्हाळा सुरू झाल्यानंतर टेरेसवर झोपायची मज्जा वेगळीच होती. शुभ रात्री‌…

आपण म्हणतो तितकं सोपं नसतं प्रत्येकाचं आयुष्य..

Good Night..

Relationship Good Night Messages Marathi | शुभ रात्री मैत्री संदेश

good night messages marathi

Download Image

मन वळु नये अशी श्रध्दा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्यं संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरु नये अशी नाती हवी…

।।शुभ रात्री‌।।

रडल्यामुळे कधी कोणी आपले होत नसते.. आणि तसेही जे आपले असतात ते रडू थोडी देतात..

Good Night

आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात पण जे आपले असतात ते नेहमी आपल्या सोबत असतात. अगदी तुमच्यासारखी..!

Good Night ✨

नात्याला आपुलकीची ओढ असेल तर ते कधीच तुटत नाही..

Good Night

good night messages in marathi

Download Image

कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल.

Good Night

गैरसमजाचे ढग वातावरणात पसरले की, मनाचा संपर्क तुटतोच..

Good Night

नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही..

Good Night

कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी माणुसकी कमी करु नका..!! चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका. पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका.

🙏🏻 Good Night 🙏🏻

Good Night Images In Marathi

Download Image

काही नात्याना नाव नसते पण त्यांची किंमत अनमोल असते.

।।शुभ रात्री।।

नात्यांची गुंफण विश्वासाच्या धाग्याने होते तोच विश्वास तुटला तर गुंफणाचा गुंता व्हायला वेळ लागत नाही.

Good Night

मातीने एकी केली तर विट बनते, विटेनी एकी केली तर भिंत बनते, आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते, या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत.

Good Night

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही..

।। शुभ रात्री ।।

god shubh ratri

Download Image

कितीही कोणा पासून दूर रहा. परंतु चांगल्या स्वाभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठे धन आहे..

Good Night

या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका. चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं..

शुभ रात्री..

Love Good Night Images In Marathi | गुड नाईट लव मैसेज

माणूस किती पण खुश असूद्या पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा तो फक्त त्याच व्यक्तीची आठवण करतो ज्या व्यक्तीवर तो मनापासून प्रेम करतो..!

Good Night ✨

आयुष्यात दोनचं गोष्टी पाहिजेत. एक कुटुंबाचं प्रेम, आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ, अगदी तुमच्यासारख्या…!

शुभ रात्री..

Funny Good Night Messages

Download Image

आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर आहे..!!

!! शुभ रात्री !!

मी वचन देतो की माझ्या हृदयात तुझी जागा कोणीही घेणार नाही मी सदैव तुझा असेल…!!

Good Night

प्रेम आणि विश्वास कधी गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही…!!

Good Night

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम..

Good Night

Funny Good Night Messages in marathi

Download Image

प्रत्येकजण सुंदर असतो, कोणी चेहऱ्याने तर कोणी मनाने..

Good Night..

समोरील व्यक्ती आपल्याला किती महत्व देतेय हे पाहण्यासाठी कधी कधी… अबोल व्हावं लागतं.

!! शुभ रात्री‌ !!

आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजे, कुटुंबाचे प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ अगदी तुमच्यासारखी..

Good Night…

नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका कारण आपण जे करु त्याचप्रमाणे नशिब घडेल यावर विश्वास ठेवा..

।।शुभ रात्री‌।।

Funny Good Night images

Download Image

प्रत्येक नाते प्रेमाचे हवे, अशी काहीच गरज नसते.. तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे, याला खूप महत्व असत..

Good Night

जिव लावलेल्या व्यक्तीला एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते. ज्याने मनापासुन खरी मैञी आणि प्रेम केलेले असते.

Good Night

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देतं वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो.

गुड नाईट…

आयुष्यात अश्या माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते..

🙂 शुभ रात्री‌ 🙂

friend good night quotes

Download Image

नाराज झाल्यानंतर दोष कुणाचाही असो बोलायला सुरुवात तोच व्यक्ती करतो जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

Good Night

काल लग्न झालेलं तिचं पाहून रात्री तो खूप रडला.. सकाळी सगळं विसरून कामा वरती तो हजर राहिला.. जबाबदारी सगळं विसरायला लावते प्रेम वगैरे आज काल होत राहत स्वप्न पुर्ण करणे सर्वात आधी राहत..

Good Night

रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं.

!! शुभ रात्री !!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे 🙂

Good Night 💤

वेळ.. जेव्हा न्याय करते तेव्हा. साक्षीदाराची गरज पडत नाही.

।।शुभ रात्रि।।

जीवन जगताना काळजी घेणारं कुणीतरी सोबत असेल तर.. चार क्षण आणखी जगावंस वाटतं.

शुभ रात्री.

आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधीच स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही एकमेकांसाठी जगणे यालाच जीवन म्हणतात.. म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात..

Good Night

Good Night Status In Marathi | शुभ रात्री स्टेटस मराठी

आयुष्यात हे महत्वाचं नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे आहे सगळ्यात महत्वाचं हेच असते की, आज आपल्या सोबती कोण आहे?

Good Night 🍁

मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं.. जीवनात सुखःदुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं..

!! शुभ रात्री‌ !!

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.

।।शुभ रात्री‌।।

पाप शरीर करत नाही विचार करतात, अन् गंगेत शरीर धुतलं जातं विचार नाही.

!! शुभ रात्री !!

गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं.

!! शुभ रात्री !!

शब्दांचे दागिने अंगी माझ्या, भावनेचा उरावर भार नाही..

खरे खोटे सगळेच या कारण, झोपडीला माझ्या अजुन दार नाही..

Good Night

ज्याला रात्रभर झोप नाही लागत..
त्यालाच माहीत असतं, सकाळ होण्यासाठी किती वेळ लागतो.

Good Night

आयुष्य असेल तर आम्ही रोज तुमची आठवण काढू, विसरलो तर समजा देवाची आठवण आली.

Good Night

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे “चांगले विचार” कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेवु शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात.

Good Night

नात्यांना पैशांच्या नजरेने पाहू नका, कारण नांत टिकवणारी माणसं बहुतेकदा गरिबच असतात..

।। शुभ रात्रि ।।

चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही. पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे..

!! गुड नाईट !!

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते..

!! शुभ रात्रि !!

एकांत क्षणी कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाःच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

Good Night 😴

आमची आपुलकी समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल. लोक रुप पाहतात आम्ही हृदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात आपली माणस पाहतात पण आम्ही आपल्या माणसामध्येच जग पाहतो…!!

!! शुभ रात्री !!

हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळाली असती, तर “Compromise” काय असतं ते कधी कळलंच नसतं !!

!! शुभ रात्री !!

मि म्हणायचो, जे होईल ते बघून घेईन पण खरं सांगू, जे होतंय ते बघवत नाहीये..

Good Night

आयुष्य बदल्यासाठी स्वतःचे विचार बदला, कारण विचारांमुळेच आयुष्य घडत असते.

!! शुभ रात्री !!

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..

Good Night 🍁

चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणीच काढलेली बरी..

गुड नाईट

समाप्ती।

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण “good night quotes in marathi” वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे शुभ रात्री कोट्स संदेश पाहिले.

तरी या good night quotes मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇

Leave a comment