Anniversary Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Anniversary Wishes For Husband In Marathi

Download Image

आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणजेच ( Marriage Anniversary ) प्रत्येक जोडीदारासाठी आनंदाचा आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो..

या दिवशी आपले प्रिय जोडीदार आपल्या आयुष्यात ऐकणारा हा दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतो.. ह्या दिवशी आपल्याला सर्वांत जास्त गरज असते ती म्हणजे प्रेमल शब्दांनी आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक विचारांची व संदेशाची..

या संदेशांद्वारे व विचारांद्वारे आपल्या जोडीदारावर असलेले आपले प्रेम व्यक्त करू शकता… असेच आपल्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे म्हणजेच anniversary wishes for husband in marathi अनेक संदेश इथे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

भावना समजण्यासाठी शब्दांची गरज नसते, त्या तर हृदयातून व्यक्त होत असतात. तुम्ही कायमच माझे हृदय जिंकून घेतलेत. माझ्या भावना आणि हृदय जपण्यासाठी खूप – खूप धन्यवाद. माझ्या लाडक्या आणि प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या जीवनाचे सार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. माझ्या जगण्याची उमेद फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. माझ्या लाडक्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या स्वप्नातील राजकुमार…
अर्थात माझ्या पती देवांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या शिवाय माझे जीवन पूर्णपणे अधुरे आहे. तुम्ही आहात म्हणूनच माझे जीवन आनंदाने भरलेले आहे. माझ्या आदरणीय पती परमेश्वराला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा, असेच रुसत राहा, पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो मला तुझी साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

आयुष्याच्या या वळणावर सप्तपदीचे फेरे सात सुख दुःखात सदैव तुझी समर्थपणे मज लाभली साथ! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे माझ्या प्रिय पतीस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी देवाची ऋणी आहे ज्याने मला तुझ्यासारखा नवरा दिला आता मला देवाकडून काही नको आहे ! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा मराठी संदेश..

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, जीवनाचं सार आहात तुम्ही, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🍫

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो हीच इस्वरचरणी प्रार्थना.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे आपल्या लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💫

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

Happy Anniversary 🎉

एनिवर्सरी जाईल-येईल पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव ❤️

माझ्या प्रिय तुला हार्दिक शुभेच्छा. एकत्र राहण्याची (…) वर्षे झाली आहेत. आमचे प्रेम असेच बहरत राहो आणि आम्हाला अनंत आनंद मिळो. Anniversary च्या खुप खुप शुभेच्छा!

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..🍁

वर्धापन दिनाच्या प्रसिद्ध शुभेच्छा संदेश मराठी | Famous Anniversary Quotes

Happy Anniversary Dear, मला समजून घेतल्याबद्दल, प्रेमाचा अर्थ आणि तुमच्या प्रेमाने आणि संयमाने हे नाते निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. आमचे प्रेम असेच वाढत राहो!

माझा नवरा माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..

तुमच्याबद्दलचे माझे विचार बदलणार नाहीत,
वर्ष बदलेल पण हृदयाची स्थिती बदलणार नाही !
Happy Anniversary My Husband

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूडला सांभाळून घेते अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते जशी की तू… अशा माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…

एकमेकांवर विश्वास ठेवून साकारलेले हे प्रेमळ नाते, कायमचे सुरक्षित राहो. हीच देवाकडे प्रार्थना तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोन्यापेक्षाही सुंदर असलेल्या माझ्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi

लग्नात यश हे फक्त योग्य जोडीदार शोधून मिळत नाही, तर योग्य जोडीदार होण्याने मिळते. अशा माझ्या योग्य जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..

माझा संसार पूर्ण करणाऱ्या माणसाला, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

आमच्या लग्नाचा दिवस कदाचित परिपूर्ण नसेल, पण तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. इतकी वर्षे माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. Happy Anniversary Dear..

प्रेम म्हणजे काय हे मला माहीत असेल तर ते तुझ्यामुळे आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात..!
Happy Anniversary My Husband

तुम्ही माझे पती झाले आणि माझ्या जीवनाला खरा आनंद आणि अर्थ प्राप्त झाला. अशा माझ्या प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझे तुझ्यावरचे प्रेम चिरंतन आहे. माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत आणखी एका वर्षासाठी शुभेच्छा.

मला तुझ्यासारखं प्रेम मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

Happy Anniversary Dear..

तुम्ही सर्वोत्तम, प्रेमळ, कोमल आणि सर्वात सुंदर व्यक्ती आहात.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ध्येय असावे उंच तुमचे, मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची, ह्याच माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रेम, विश्वास, भागीदारी, सहिष्णुता आणि दृढता यांचा उत्सव.
Happy Anniversary Dear Husband

कधी भांडतो कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू असेच रुसत राहू, पण नेहमी असेच सोबत राहू !
आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..

तू माझा सूर्य, चंद्र आणि माझे सर्व काही आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

“इतक्या वर्षांनंतरही, माझे तुझ्यावरील प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे.” तुला लग्न वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..

तुमचा चेहरा दररोज माझ्या चेहऱ्यावर हसू आणतो आणि त्यासाठी मी सदैव कृतज्ञ आहे. ज्या व्यक्तीने माझे हृदय गाणे बनवले त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझ्याशी लग्न करणे ही माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट होती. Happy Anniversary Dear..

तुम्ही नेहमीच माझा आदर करीत आलात. तुमच्या सहवासाने माझे आयुष्य सप्तरंगांनी उजळून गेले. तुमचा सहवास असाच मला लाभत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या आदरणीय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

लग्न हे एक असे नाते आहे ज्यामध्ये एक नेहमीच बरोबर असतो आणि दुसरा नवरा असतो. Happy Anniversary Dear Husband 💟

First Anniversary Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या माझ्या पती राजाला हार्दिक शुभेच्छा.

कसे गेले वर्ष कळलंच नाही. लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात. हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

“एक वर्ष उलटून गेले, आणि मला ते कळलेही नाही. आपले उरलेले आयुष्य ही असेच सुरळीत चालणार आहे अशी मला आशा आहे.” आपल्या Anniversary च्या खुप खुप शुभेच्छा..

तुझ्यावर प्रेम करणे ही आवडती गोष्ट आहे.. Happy Anniversary 🎁

एखाद्याने मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला शक्ती मिळते, तर एखाद्यावर मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला धैर्य मिळते. पहिल्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

वरील “Anniversary Wishes For Husband In Marathi” म्हणजेच “नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश” पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही सुंदर व चांगले विचार, संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇

Leave a Comment