डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार | Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

dr babasaheb ambedkar quotes in marathi

Download Image

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वोत्तम सुविचार मराठी – Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi भारताचे थोर विचारवंत, तसेच भारताचे संविधान बनविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता अशा महानायकाचे विचार आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

Best Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi – सर्वोत्तम बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी

  • जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
  • शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
  • शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे.
  • महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
  • जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल.
  • शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
  • काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका
  • जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
  • बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
  • व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय.

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी

dr babasaheb ambedkar

Download Image

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
dr babasaheb ambedkar quotes

Download Image

 👇👇 हे देखील वाचा 👇👇 
Best स्वामी विवेकानंद कोट्स, सुविचार मराठी – Swami Vivekananda Quotes
Best Aai Quotes In Marathi | आई वर लिहिलेले उत्कृष्ट स्टेटस, कोट्स
Alone Quotes, Status In Marathi – एकटेपणा वर आधारीत कोट्स व स्टेटस मराठी

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
dr babasaheb ambedkar jayanti

Download Image

मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
dr babasaheb ambedkar image

Download Image

प्रत्येक पिढी हे नवे राष्ट्र घडवते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पती – पत्नीमधील नाते हे मित्राप्रमाणे असायला हवे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
babasaheb ambedkar

Download Image

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
babasaheb ambedkar quotes

Download Image

शिका !

संघटित व्हा !!

संघर्ष करा !!!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
babasaheb ambedkar jayanti

Download Image

शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
babasaheb ambedkar banner

Download Image

प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा,’ हेच माझे तरुण विद्यार्थ्यांना सांगणे आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Bhim Jayanti Quotes In Marathi – भीम जयंती कोट्स मराठीमध्ये

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही 

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शंका काढण्यासदेखील ज्ञान लागते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसू कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्याइतकी स्वतःलामोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. 

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

साऱ्या देशाला एकाच भाषेत बोलायला शिकवा, मग बघा काय चमत्कार घडतो ते 

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

करूणेशिवाय विद्या बाळगणारा हा कसाई असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीय आहोत ही भूमिका घ्यावी  

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंसा ही वाईट गोष्ट आहे. पण गुलामी ही त्याहीपेक्षा वाईट गोष्ट आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

समाप्ती.

वरील “Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi” म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..

तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर किंवा इतर काही सुंदर विचार तुमच्याकडे असल्यास तेही आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख व साईट मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏🙏

आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇👇

Leave a Comment