ज्या माउलीने आपल्याला जन्म दिला त्या आईवर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काही उत्कृष्ट असे Aai Quotes in Marathi आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईचे स्थान सर्वस्वी असते कारण आईची किंमत आपल्याला आईपासून लांब गेल्यावरच कळते.. म्हणूनचं म्हणतात ना ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ कारण तुमच्याकडे सगळं काही असेल पण आईचं प्रेम नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे…
आई साठी लिहिलेले उत्कृष्ट कोट्स | Top Aai Quotes in Marathi
- सगळंच जग पाहिल्यावर कळालं, आई पेक्षा सुंदर या जगात काहीच नाही..
- जिच्या हसण्याने मी स्वतःच अस्तित्व मानतो, देवा माफ कर, तुझ्या आधी मी माझ्या आईला मानतो.. #आई
- कोणाचा आधार तर कोणाचं सर्वस्व आहे माझी आई माझ्यासाठी माझं विश्व आहे.
- स्वतःच्या आधी जि आपला विचार करते ती म्हणजे आपली आई…
- आपली आई भलेही शिकली नसेल पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र तीच शिकवते..!!
- अगदी शेवटपर्यंत बिनव्याजी प्रेम करणारी बँक म्हणजे ‘आई’…!
- आयुष्याच्या वाटेवर चालतांना अनेकांचे चेहरे बदलतांना पाहीले, पण प्रत्येक वेळी मी माझ्या आईला माझ्यावर प्रेम करतांना पाहीले…!
- डोळे पाणावले कि सगळ्यात आधी आईचं आठवते !
- जगात कुणी कुणावर कितीही प्रेम केलं तरीही आई सारखी निखळ आणि निस्वार्थी प्रेम कुणीच करू शकत नाही..
- बाप नसल्यावर… बापाची जागा अचोखपणे पार पाडते. ती आई असते..
- देव सगळीकडे असू शकत नाही, म्हणून तर त्याने ‘आईला’ बनवलं.
- असह्य वेदना झाल्यावर त्या सोसायच्या कशा म्हणून तोंडातून निघणारा जगातील एकमेव शक्तिशाली शब्द म्हणजे आई.
- सगळं जग फिरलात तरी आई सारखी माया लावणारी व्यक्ती कुठेच भेटत नाही.
- घरात पाऊल ठेवताच शोधली जाणारी व्यक्ती म्हणजे आपली. आई.
- आपल्या माणसांसाठी स्वतःलाही विसरून, आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावणारी एकमेव खंबीर व्यक्ती म्हणजे ‘आई’
- आईसाठी आईएवढं कधीच करता येत नाही.
- माणसे बदलतात, नाती बदलतात, लोकं बदलतात मात्र आई बदलत नाही सुरवातीपासून शेवटपर्यत ती जशीच्या तशी असते..!!
- मृत्युसाठी असंख्य वाटा पण जन्मासाठी फक्त आई..
- सगळं जग बघितलं आई पण तुझ्या सारखं निःस्वार्थ प्रेम करणारं कोणच नाही मिळालं..!!
- कुठेही न मागता भरभरून मिळालेल दान म्हणजे #आई
- व्यपता न येणारं अस्तित्व आणि मागता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व..
- एक दिवस तिचा असु च शकत नाही जी पूर्ण आयुष्य माझ्यासाठी जगली माझी आई…
- काहीही करा पण, आईला दुखावू नका.. तिच्या एवढं कोणीच करत नाही आपल्यासाठी..!
- मनातल्या भावना समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई..
- कशी हार मानून घेऊ ज्यांनी मला जन्म दिलाय ते अजुन पर्यंत कष्ट करत आहे..
आई वर आधारीत स्टेटस | Aai Status in Marathi
सगळे दिले मला आयुष्याने आता एकच देवाकडे मागणे. प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे.
आईच्या पाया पडणं म्हणजे आकाशाला गवसणी घालणं.
आई सामोर असे वागणे बरे नव्हे चूक नसताना तिला बोलणे बरे नव्हे, सगळ्यांचा संताप सहन करते म्हणून तिच्यावर बेहिशेब चिडणे बरे नव्हे !
काळजी घेत जा स्वतःची, कारण या छोट्याश्या आयुष्यात, खूप स्पेशल आहेस तू माझ्यासाठी. I love you आई…
आई ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
---|
100+ Best Alone Quotes And Status In Marathi – एकटेपणा स्टेटस मराठी |
100+ Best Relationship Quotes In Marathi – मराठी नातेंसंबंध कोट्स, स्टेटस |
आई हा शब्द म्हणायला खूप छोटा आहे पण तिने घरासाठी मुलांसाठी घेतलेले कष्ट खूप मोठे आहेत.
जिने आपल्याला या जगात आणलं त्या माऊलीची सेवा करायला आपण कधीच कमी पडायचं नाही.
देवाकडे कधी काही मागायची गरज अजून तरी पडलेली नाही, आणि पडणार पण नाही, जोपर्यंत माझी आई जिवंत आहे..!
आईला कधीतरी हसताना नीट पाहा, जणू तुम्हाला देवच हसल्यासारखा वाटेल.
मुलांवर जीव ओवाळूणं टाकनारी आईचं असते.
आईच्या अस्तित्वातुन जगण्याची प्रेरणा मिळते तिच्या शब्दामधे असणारी ममता माझ्या स्वाप्नांना उज्वल करते.
माझी आई म्हणते… तू त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होईल आणि आपल्याला झालेला त्रास विसरून आनंद साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होईल…
आई पासून दूर राहिल्यावर समजत की आई शिवाय जगणं किती आवघड असतं…!
जन्मल्या पासून ते मरेपर्यंत जीव लावते ती म्हणजे आपली आई…!
आई या न्यायालयात सर्व गुन्हे माफ होतात..!
आईवडीलांसोबतचं नातं सांजसखी गर्भापासून सुरु होतं त्याला शेवट नसतो..
आजारी आपण असतो पण झोप आईला येत नाही.
किती ही EMI भरले तरी तुझ्या मायेचे कर्ज मी कधीच नाही उतारु शकत..!
जिने जगात आणलंय तिला पूर्ण जग दाखवायचं.!! #आई
घरातल्या आईला खुश ठेवा, मंदिरातली आपली आप खुश होऊन जाईल.
आई तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला कोणी नाही.
आई ह्या शब्दाने धीर माळतो!
आयुष्यात सर्व काही बदलेल, आईचं प्रेम सोडून.
आईला माहीत असत…. दुनिया बघायच्या वयात दुनियादारी पाहिलेला तिचा वाघ कधी ही आयुष्यात खचणार नाही..!
सगळ्यात जास्त निवांत झोप, ही आईच्या कुशीतच लागते. मायेची ऊब आणि तिचा तो डोक्यावर ठेवलेल्या हाताचा स्पर्श हेच तर जगातील सगळ्यात मोठे सुख असतं…
आईची माया ही जगातील सर्वात अनमोल ठेव, पूजावं त्या माऊलीला तिच्यातच मानाव देव…
प्रत्येक आईचा आदर करायला शिका..!!
ती एक स्त्री आहे म्हणून नाही, तर तुम्हाला पण एका चांगल्या आईने वाढवले आहे हे सिद्ध करण्यासाठी..!!
आई शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हाने धन्य कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
घरी गेल्यावर आईच्या हातचं जेवण म्हणजे.. निव्वळ सुख.
Mother Quotes in Marathi
आपल्या आईची काळजी घेत जा.. कारण ह्या खोट्या जगात, तिच्या एवढं प्रेम करणारं कोणीच भेटणार नाही.
जगाच्या बाजारात सगळं काही मिळतं पण आईचं प्रेम काहीही केल्या मिळतं नाहीं…
आईला माहित असतं… ‘दुनिया’ बघायच्या वयात ‘दुनियादारी’ पाहिलेला तिचा वाघ आयुष्यात कधीच खचणार नाही..!!
कुणी प्रेमाचं नाव काढलं की, मला माझ्या आईचा चेहरा दिसतो. एवढाच अर्थ मला प्रेमाचा कळतो..
Everything is Temporary But आईचं प्रेम is Permanent
आता शंभर वर्षे जगण्याची इच्छा नाही राहीली, आता फक्त येवढी इच्छा कि जो पर्यंत आई आहे तोपर्यंत जगलो म्हणजे बस झालं..!!
खुप दमली आहेस का. गं…?? अस फक्त आपुलकीने एकदाच विचारा हे आई साठी सर्वात मोठा आधार असेल..!!
कुणाला आयुष्य देणं जर शक्य असतं, तर मी माझा प्रत्येक श्वास आईच्या नावाने लिहिला असता…!
आईमुळे घरात लक्ष्मी वसते, अन बापामुळे प्रत्येक घरात दिवाळी सेलिब्रेट होते.
आज काय झालं काहीच माहिती नाही पण दिवसभर नुसता आईची आठवण काढत होतो miss you aai..
आज तोच दिवस आहे ज्या दिवशी माझ्या रडल्याने माझी आई पहील्यांदा हसली होती…!
आईच्या कष्टाची जाणीव आहे म्हणुन तर आज मनात मोठं होण्याची जिद्द आहे.
मैत्रिणीसारखी आई आणि आईसारखी मैत्रीण मिळायला पण नशीब लागतं.
‘आई’ निःस्वार्थपणे आपलं संपूर्ण आयुष्य सावरणारी एकमेव व्यक्ती..
आम्हाला बोलण्यासाठी मैत्रिण वगैरे नाही लागत, कारण आमची मैत्रीण तर आमची आईच आहे..
Thoughts on Mother in Marathi | आई साठी सुविचार
इतके भोगले सारे कधी कुणाशी तक्रार नाही तिला फक्त प्रेमाचे दोन शब्द पाहिजे फार काही नाही.. #आई
आयुष्य जास्त नकोय, जोपर्यत आई आहे तोपर्यतच हवंय…!
एकदा सहज पावसाला विचारले, एवढा जोरदार पडतोस, तुला लागत नाही का? पावसाने सुंदर उत्तर दिले, सरळ आईच्या कुशीत पडतो, वेदना कशा काय होतील…
निःस्वार्थपणे आपलं संपूर्ण आयुष्य सावरणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई…!
आई ही व्यक्ति आहे म्हणून आजपर्यंत सुखी आहे..!!
डोळे पाणावले की सगळ्यात आधी ‘आईचं’ आठवते.
पाणी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन झाड वाढवतो. म्हणूनच कदाचित पाणी हे लाकूड कधीच बुडू देत नाही. पालकांचेही हेच तत्व असते..!
जगाला कौतुक वाटावं म्हणून नाही, तर आईला अभिमान वाटावा म्हणून मोठं होयचय.
जोपर्यंत माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यत माझ्या आयुष्यातला प्रत्येक गोंधळ हा सुरळीतच पार पडणार…!!
जेव्हा पैसे कमवायची वेळ आली तेव्हा समजलं की आई वडिलांचे पैसे नको त्या ठिकाणी खर्च केले.
त्या घरात कोणत्याच कामात यश येत नाही, ज्या घरामध्ये आई वडिलांची इज्जत केली जात नाही .
सगळी दुनिया काळजी करणं सोडू शकतं, पण आई नाही…!
आई.. ह्या शब्दाचा अर्थ जर सांगायला बसलो तर त्या माऊलीचे गुणगान करणे शक्य नाही.
आई वर लिहिलेले उत्कृष्ट अशी कविता.
रात्रीची पोळी तिनी वेगळ्या डब्यात ठेवली होती. झोपडीतली एक माय मी पाहिली होती.
लेकराला गरम पोळी वाढली होती स्वतः शिळी पोळी भाजून घेतली आणि खाल्ली होती. झोपडीतली एक माय मी पाहिली होती.
लेकरू रोज उपाशी राहू नये म्हणून कष्ट ती करत होती. घालायला पायात चप्पल नव्हती. पायावर भेगा आणि जखमा होत्या. तरीही पण लेकरू सुखात राहावं यासाठी कामाला तशीच जात होती. झोपडीतली एक माय मी पाहिली होती.
घरात काळाकुट्ट अंधार होता. पण तिनं त्या घराला मायेची ऊब दिली होती. तिच्या मनात फक्त हेच होतं लेकराला चांगलं शिक्षण द्यावं आणि त्याला खूप मोठं करावं.
स्वतः साठी न जगता लेकरासाठी ती जगत होती. झोपडीतली एक माय मी लेकरांसाठी जगताना पाहिली होती…
लेखक :- सेजल भूमकर
विठूही माऊली ज्ञानाही माऊली माय आसावली त्यांचे ठायी
तैसे होण्या आई देशील का दान थोडे मायपण तुझ्यातले!
लहानपणी पाऊस पडला की जाम भीती वाटायची. विजेचा आवाज घाबरून टाकायचा लाईट पण नेमकी लगेच जायची. रात्री मग झोप तर काही यायची नाही. आई ची कूशी मग सगळी भीती घालवायची. आई ला घट्ट आलिंगन दिलं की माझी भिती पळून जायची..
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday wishes for Aai
आई
तुला आयुष्यातील प्रत्येक सुख आणि आनंद मिळो, तू घेतलेल्या प्रत्येक कष्टाचं फळ तुला मिळो, तूझ्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होवो, कधी रागाच्या भरात तुला नाही बोललो असेल तर Sorry हा, तुला कायम खुश ठेवायचं प्रयत्न करत राहीन, तुझ्या चेहऱ्यावरची Smile अशीच खुलत राहो, तुझ्या हातची चव एक नंबर आहे आई, Ker तू कायम अशीच माझ्योसोबत रहा, love you आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आई ची बेडी माया, पडतो मी तुझ्या पाया, कायम तुझ्या पोटी जन्मो हीच माझी जन्मोजन्मी ची आशा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला..!
Happy Birthday Aai
आईवर आधारित विचार
दिवसभराच्या कामानंतर आईचा जेव्हा चेहरा बघतो.. तेव्हा दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो.. दिवसभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबर आपण आईला देतो. लहानपणापासून ते मोठे होऊ पर्यंत लहानपणी शाळेतून आल्यावर आपण आईला शोधत असतो आणि आता जरी मोठे झालो तरी ऑफिस मधून घरी आलो तरी आपण आईला शोधून प्रत्येक दिवसभरातील गोष्टी सांगत असतो..
आईला सर्वाधिक अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला मुलगा आपल्या पत्नीसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो. बाबांनो, लक्षात ठेवा, जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते, कारण त्याचं वय हे सर्व नात्यांमध्ये नऊ महिन्यांनी अधिक असतं. आई कशीही असू द्या, तिला आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका.
ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं करून पैसे कमावण्याचा लायक बनवल त्यांनाच तुम्ही पैसा आल्यावर सांभाळणार नससाल तर तुमच्या त्या पैशाला काही एक अर्थ उरत नाही..!!
समाप्ती.
अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण Aai Quotes in Marathi वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे आईवर आधारित सर्वोत्तम कोट्स संदेश पाहिले.
तरी या Aai Quotes in Marathi मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..
धन्यवाद.. 🙏🙏
आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇