प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या एकदा आयुष्यातून निघून गेल्या की त्या पुन्हा भेटत नाहीत. यातीलच एक मौल्यवान गोष्ट म्हणजे आपली वेळ – Time जो की एकदा निघून गेला की पुन्हा वापस ऐत नाही. मग तो व्यक्ती कितीही मोठा असला किंवा धनवान असला तरीही त्याला गेलेली वेळ परत आणता येत नाही..
म्हणूनचं तर म्हणतात ना Time Is Money – वेळ हीच खरी संपत्ती आहे.. अश्या वेळेचे महत्त्व सांगणारे खुप सारे उत्कृष्ट असे सुविचार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Best Time Quotes In Marathi | वेळेवर आधारित सर्वोत्तम कोट्स मराठी
- सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटीच कळतं की, हातातून निसटून गेलेल्या वेळेतच तर सुख होते.
- आयुष्य बदलायला वेळ लागत नाही पण वेळेला बदलायला पूर्ण आयुष्य लागतं..!
- संयम ठेवला की दिवस बदलायला वेळ नाही लागत..!
- जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही सगळ्यांचे नंबर मोबाईल मध्ये सेव आहेत पण.. चार शब्द बोलायला वेळ नाही.!!
- वाईट काळात लोकं फक्त विचारपूस करतात, पण खरी काळजी तर ‘आई बापच’ करतात..!
- वाईट काळ हा ऋतूप्रमाणे येणारच आहे, हे जर स्वीकारलं तर डिप्रेशन येत नाही.
- अहंकाराची उडी काही कामाची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आलं की कार्यक्रम होतो…!
- वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही…
- अंगातली ताकद खिशातला पैसा. आणि मिळालेला वेळ जपून वापरा. हे एकदा गेलं ना तर पुन्हा भेटणं अवघड असत.
- कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, आणि काही गाजवणार असतात..!
- वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात. पण वेळ नसतांना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात…
- वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या, नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत…!
- गेलेली वेळ परत येत नाही म्हणून जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.
- वेळ ही आपल्या हिशोबाने चालणारी नसते म्हणून आपल्याला तिच्या हिशोबाने चालणे जमले की यश फार दूर राहत नाही.
वेळेवर आधारित स्टेटस मराठी | Time Status In Marathi
अंतराचा विचार करुन पुढे न जाणारी माणस ही नेहमी वेळ निघुन गेल्यावर पुढे जाण्यासाठी धडपड करत असताना मागे राहिलेली दिसतात…
कुणी कुणाला “+” करतो.
कुणी कुणाला ” – ” करतो.
कुणी कुणाला “x” करतो.
कुणी कुणाला “:” करतो.
पण, परमेश्वर वेळ आली की,
सगळ्यांना ” = ” करतो.
गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते..
हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात..!!
एक क्षण’ रडवून जातो, एक क्षण ‘हसवून’ जातो, ‘जीवनाच्या’ प्रवासात येणारा ” प्रत्येक क्षण” हा काहीतरी नक्कीच शिकवून जातो..!
प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो..!
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.
वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो..!.!
दिवस आज वाईट आहेत.. उद्या चांगले असतील. पण वाईट दिवसांत वाईट वागलेली माणसं कायम लक्षात राहतील.
वेळ आणि परिस्थिती कधी सांगून येत नाही त्यामुळे एखाद्यावर हसताना विचार करून हसा..!
वेळ बदलत आहे, तश्या गोष्टी पण बदलत आहेत, लोकं आयुष्यातून निघून जात आहेत, एकटेपणा चांगला वाटू लागलाय आणि मी शांत होत चाललोय…!
लोक आठवण पण तेव्हाचं काढतात जेव्हा त्यांना वेळ घालवायला कुणीचं नसतं..!
पुण्य दिसत नाही, पण वेळ आली कि बरोबर अनुभवता येतं. कारण कमावलेल्या पैश्याचं काम जिथं थांबतं, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरु होत..!
स्वतःला इतकं मजबूत बनवा कि आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात पण तुमचा सय्यम ढळला नाही पाहिजे.
वेळ जात नाही म्हणून खूप नाती तुम्हां भेटतील, पण खरी नाती मात्र वेळात वेळ काढून आठवतील…!
माणसाच्या स्वभावाला औषध असतं. “वेळ” नावाचं…
आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा.
‘मुहूर्त शिवाय’ जन्म घेणारा माणूस आयुष्यभर ‘चांगल्या मुहूर्ताच्या’ चक्कर मधे एक दिवस ‘मुहूर्त शिवाय’ मरण पावतो…
योग्य वेळ आल्यावर सगळं काही ठीक होत. पण माझी योग्य वेळ कधीच येत नाही माझा आणि वेळेचा नेहमीच 36 चा आकडा आहे.!
माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात.
“वेळेला कोणी येत नाही” आणी वेळ नीघुन गेल्यावर म्हनतात, मला बोलावल असत तर आलो असतो…
वाईट सवयी जर वेळेत बदलल्या तर त्या आपली वेळ बदलवु शकतात.
वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते..
वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
वेळ ही प्रत्येकाची योग्य वेळीच येत असते…
आवडती व्यक्ती सुंदर नसली तरी चालेल पण वाईट काळात साथ देणारी आणि आभाळाएवढं प्रेम करणारी असावी…
कोणत्याच गोष्ठीचा गर्व नसावा कारण वेळ आज तुमची तर उद्या दुसऱ्याची असू शकते.
जीवनात संकट आल्यावरच समजत की, कोण आपलं आहे आणि कोण आपली समस्या दुरून बघणार. कारण वेळ पडल्यावर आपली सावली पण साथ सोडते.
जन्म मृत्युचा हा फेरा ना बाद ठरला कुणासाठी म्हणे अटळ असे तो ना थांबे तो ही वेळेसाठी…..
उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आत्ताच करा..
आपल्याच माणसांना वेळेवर वेळ दिला नाही तर मानस खुप दूर निघून जातात…
वेळ आल्यानंतर सावली होणारे काही हक्काची माणसं आयुष्यात कधीही एकटं पडू देत नाही…
माणसांनी वेळ आणि परिस्तिथी पाहून स्वतःला बदलायला हवं It’s time to Update and Upgrade…
यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जिद्द, संयम, वेळ आणि मेहनत करायचे बळ लागते.
आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं, तर कमवायची किंमत आणि गमवायची भिती कळली नसती.
चांगली वेळ मराठी स्टेटस | Good Time Marathi Status
आज वाईट आहे, उद्या चांगली येईल वेळच तर आहे बदलून नक्कीच जाईल.
रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही, जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या.. कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहात नाही.
आपल्या “चांगल्या वेळेचा” अहंकार माणसाने कधीच करू नये…
Most powerful line
वेळ लागला तरी चालेल पण जे
करायचं ते स्वतःच्या जीवावर…!
यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांना एकच गोष्ट वेगळी करते ती म्हणजे ते त्यांच्याकडे असलेल्या वेळेचा कसा वापर करतात.
स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडाची एक वेळ असते देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल टाकत चला..!
वेळ लागेल पण सगळं मनासारखंच होईल तू फक्त स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा.
वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण जगुन घ्या, परत आठवणी येतात वेळ नाही.
वेळ प्रत्येकाला एक संधी देते आणि त्या संधीच सोनं करता आलं पाहिजे..
आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक वेळ असते, देवावर आणि स्वतः वर विश्वास ठेवून एक एक पाऊल टाकत चला..! आयुष्य सुंदर आहे..!!
कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे “प्रेम”
It’s ok…! सगळे दिवस सारखे राहत नाहीत. प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल..
शेवट ही सुंदर असू शकतो याचा पुरावा म्हणजे सूर्यास्त.
आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला आणि योग्य व्यक्ती मिळायला वेळ लागतोच.
धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं कि आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात…
वेळ विकत नाही घेऊ शकत कुणी पण मेहनत करून वेळ बदलण्याची धमक नक्कीच ठेवा..!!
खऱ्याची गंमत आणि खोट्याची किंमत वाढवण्याचे सामर्थ्य फक्त पैशामध्येच असते,… याचा अर्थ असा नाही कि खोटाच जिंकतो, शेवटी विजय हा खऱ्याचाच होत असतो,… फक्त आपल्याकडे हवा असतो तो संयम आणि कर्तृत्व,… मग वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही
Short Time Quotes In Marathi
वेळ तर निघून जाते., खरा विषय तर आठवणींचा आहे….
आजकाल वेळ वेळेवर वेळ मिळतच नाही !
तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
इथे प्रत्येकाचा वेळ हा त्या माणसाने केलेल्या चांगल्या – वाईट कर्मानुसार पुढे चालत असतो…
जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला “वेळ” म्हणजे जीवन..।।
कोणत्याही गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाची येते..!!
ज्या वेळी माझा सय्यम सुटणार त्यावेळी तुझ्या आयुष्याचा बाजार उठवणार..
अंतः अस्ति प्रारंभ वाईट, फसव्या, स्वार्थी लोकांचा अनुभव घेतल्याशिवाय दुनियेचा अर्थ कळत नाही..!!
काही गोष्टी वेळ घेतात संयम ठेवा.
वेळ आली कि लोक आपली लायकी दाखवतात…
“मी पण वेळे सारखा आहे” कदर नाही करणा-यांना परत भेटत नाही.
सर्वात मोठा गुरु तर वेळ आहे जी सगळं काही शिकवून जाते..!
राग क्षणात विरघळतो नाराजी दुर व्हायला वेळ लागतो.
एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कधी कोणाला लहान समजायचे नाही कारण, वेळ सगळ्यांची येते…
वेळ भेटला तर स्वतःच्या आयुष्याच पुस्तक पण वाचून बघा, किती पानं फाटलेली आहेत ते कळेल.
चांगली वस्तु चांगला माणूस चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते…
“वेळ”
वेळ कधीही दुःख ना कमी नाही करत, तर वेळ ही त्या दुःखा सोबत जगायला शिकवते.
वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एकेवेळेस सगळ्यांसाठी खास होतो.
आत्ताच वेळ आहे तर जिंदगी जगून घ्या काय माहित उद्या असू की नसू..
आयुष्यात जिथे पाठीशी उभं राहायची वेळ येते तिथे लोकं कारण देऊन निघून जातात…!
वेळेची मोठी गंमत असते, काही गोष्टी वेळेवर समजतात, आणि काही वेळ निघून गेल्यावर…
वेळ दिसत नसली तरी बरंच काही दाखवून जाते.
टाइम शायरी मराठी | Time Shayari Marathi
वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली, तर, वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवत राहतो.
इतका वेळ करूनही तीच वेळ झालीये. वेळही म्हणतेय आता वेळ नको करू, मी वेळेतच आलीये. वेळेचा खेळ सारा, वेळेलाच खरा काय तो समजेल. वेळेत सगळं गुंतलय, हे वेळच अंतः दाखवेल…!!!
वेळ निघून जाते आपण विचार करतो की असं करू का तस करू, हे झालं तर काय होईल आणि ह्या मध्येचं आर्धिवेळ निघून जाते. तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे. पण खरतर ती एक संधी आहे जी फक्त तुम्हाला मिळाली आहे. वेळेचं सोन करण्यासाठी, निर्णय तुमचा आहे.
नात्यात वेळेनुसार बदल होत राहतील पण देव जवळ एकच इच्छा आहे तुझं माझ्यावर असलेलं प्रेम आणि माझा तुझ्यावर असलेला विश्वास कायम असाच राहावं.!!!
कोणाला दुखवताना हजार वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो.
वेळ असो किंवा नाती दोन्हीही पैशाच्या जोरावर विकत घेता येत नाहीत.
वाईट वेळेत एखाद्याची मदत नाय करता आली ना तर करू नका पण कधीच त्याला टोचून बोलत जाऊ नका, कारण माणूस वाईट परस्थिती मुळ कमी आणि आपल्या लोकांचा तोचऱ्या बोलण्याने जास्त खचत असतो..!
योग्य वेळ येऊ दे! “जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते” आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल देवाची कृपा नक्की होते..
प्रयत्न करून एक वेळ हार माना पण माघार घेऊ नका, कारण माघार आपल्याला थकायला आणि प्रयत्न आपल्याला एखाद्या विषयात सर्वोत्तम बनायला शिकवतात…!!
एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्ती शिवाय जगणं पण स्वीकारतो. अस नाही की त्याच प्रेम संपत.. पण समोरच्याला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसली ना तर त्याच्यापासून दूर राहणंच योग्य असतं.
काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वत्तोम मिळतात तोपर्यत अंगात सहनशीलता असावी लागते कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात.
काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या चांगल्या असतात शक्य नसलेल्या गोष्टी चा हट केल्यास आपल्या ला च त्रास होतो
थोडा वेळ घ्या स्वतःसाठी ज्यांनी तुमचा तमाशा केलाय ना त्यांचा पणं तमाशा एक दिवस नक्की होणार कारण कर्म हिशोब करायला कधी चुकत नाही.
इतर काही सुंदर विचार…
- Attitude Status in Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस
- Alone Quotes In Marathi – एकांत, एकटेपणा वर आधारीत कोट्स व स्टेटस मराठी
- Relationship Quotes In Marathi
समाप्ती.
अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण Time Quotes In Marathi वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे वेळेवर आधारित सर्वोत्तम कोट्स संदेश पाहिले.
तरी या Time Quotes मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..
धन्यवाद.. 🙏🙏
आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇