118 Meaningful Relationship Quotes In Marathi – मराठी नातेंसंबंध कोट्स, स्टेटस

Relationship Quotes In Marathi

Download Image

आयुष्य आनंदाने जगायचे म्हटले तर अनेक प्रकारचे relationship म्हणजेच नाते संबंध तर येणारच.. अश्या नात्यावर – relationship वर आनंद, दुःख, प्रेम अश्या अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करणारे relationship quotes in marathi आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कोणतेही नातं हे एका नाजुक धाग्या प्रेमाने नाजुक असतं अश्या नात्यावर वेळोवेळी व्यक्त होन फार गरजेचं असतं. यासाठी आम्ही या पोस्ट मध्ये अनेक नाते संबंधांना व्यक्त करणारे अनेक प्रकारचे विचार घेऊन आलो आहोत..

Relationship Quotes In Marathi

Meaningful Relationship Quotes In Marathi

Download Image

नात म्हणजे काय..?

तो कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी काहीही सांगितल म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे “नात”

हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे. तेव्हा त्या हक्कांना किंमत राहते.

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,

नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं !

जिवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते.. कोणी मनाशी जुळले की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते…!!!

प्रेम ‘माणसावर’ करा त्याच्या ‘सवयीवर’ नाही: ‘नाराज’ व्हा त्याच्या बोलण्यावर पण ‘त्याच्यावर नाही: ‘विसरा’ त्याच्या ‘चुका’ पण त्याला नाही: कारण ‘नात्या’ पेक्षा मोठ काहीच नाही.

Time Relationship Marathi Quotes

Download Image

राग मनात ठेवून गोड बोलणा-या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं खूप चांगली असतात.

किती बांधू तरीही सुटते का गुंफलेल्या या नात्यांची वेणी, एक एक गोफ सुटत जातो तसे मग डोळ्यात या दाटते पाणी…..!

नाती उगाच टिकत नसतात त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो.

नात्यात होणारी हलकी फुलकी भांडणं आणि त्यानंतर एकमेकांना समजून घेणं फार गरजेच असत.. त्यामुळे नातं घट्ट बनतं…

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो. तस शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो.

Sad Relationship Quotes In Marathi

Download Image

कधी कधी माणसाला “औषधाची” नाही फक्त जवळच्या व्यक्तीची गरज असते…!!

आपण काळजी अशा लोकांची करतो जे दुसऱ्यांची काळजी करण्यात Busy असतात, काळजी तर त्यांची करावी जे आपली काळजी करतात..

नातं असो किंवा नसो मन चांगले असल्यावर जीवाला जीव लावणारे नक्कीच भेटतात.

“मी आहे ना! एवढे शब्द संजीवनी सारख काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असण खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं… समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे..नात…!”

कुठला रस्ता, कुठल्या वाटा? थकून किनारी लागल्या लाटा..
गुलाब शोधायला निघलो होतो, पायी रूतवून आलो काटा..

Best Emotional Quotes
Relationship Marathi Quotes

Download Image

नातं कोणतही असो… दिलेलं Promise शेवटपर्यंत निभवता आलं पाहिजे…

नात्यांच्या दुनियादारीत आम्ही जरा कमीच पडलोय लोक आमच्या भावनांशी खेळून गेले आणि आम्ही जवळचे हक्काचे आहेत म्हणून नाती जपत बसलोय..

नातं तेचं चांगलं असतं. ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही..!

जवळची माणसं जवळ असली की चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत असतो..!

स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही, पासवर्डची गरज पडत नाही लोकं आपोआपच कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे आवश्यक आहे..!

Relationship Marathi Love Status For Boyfriend

Download Image

नात एवढ सुंदर असायला पाहिजे की, सुख आणि दुःख हक्काने सांगता आले पाहिजे..

मनापासुन प्रयत्न केले तर राग नाही नातं टिकतं..!

हक्क पण तिथेच दाखवा जिथे आपल्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते..!

Relationship Marathi Love Status For Boyfriend

एक दिवस थांबवलं स्वतःला call आणि Massage करण्यापासून तेव्हा कळालं हे नातं फक्त मी चालवत होतो म्हणून सुरू होतं.

Real Life Relationship Status In Marathi

Download Image

आयुष्यात सगळं काही विसरता येत पण एखाद्याची लागलेली सवय नाय विसरता येत.

येवढ्या लवकर तुटणाऱ्यातला नव्हतो मी बस कोणी आल, आपलं बनवलं आणी सोडून दिलं…!

ज्याला काळजी असते ती व्यक्ती नातं बरोबर सांभाळून घेते..!

कदर करायला शिका आयुष्यात कोणी पुन्हा पुन्हा मिळतं नाही…!!!

सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलचं पाहिजे.

New Marathi Quotes On Relationship

Download Image

स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेल्या व्यक्ती पासून दूर जाताना काय त्रास होतो, हे जीव लावणाऱ्यालाच समजते..

तुझ्यापासून दूर राहावसं वाटत नव्हतं, पण तुझ्या वागण्याने मला तुझ्यापासून दूर राहायला भाग पाडलं.

आपल्या आयुष्यात काही लोकांची रिप्लेसमेंट कधीच मिळत नसते.!!

स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात भाकरी सुध्दा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते, त्याच प्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात.

आयुष्यभर हसवले तुला पण कधी रडवून नको जाऊस आयुष्यभर काळजी करेल तुझी मला कधी सोडून नको जाऊस…

Love Relationship Quotes in Marathi

Download Image

कोणत्याही नात्यात गुंतून राहतांना जरा विचार करा. कारण आजकालच्या सोशल मिडीयाच्या जगात रोज एका नवीन नात्याचा शोध लागतो आणि जिथं नवीन नातं जोडलं जात तिथं जुन नातं खूप दूर निघून गेलेलं असतं.

असं वाटलं होतं हेही दिवस जातील आणि आपल्यातले वाद कमी होतील आणि तू मनापासून realtionship ठेवशील आणि आपल्या मध्ये भांडण कधीच होणार नाही.

असचं वाटलं होतं मला, पण तू काय केलंस realtionship च दुसऱ्याशी ठेवलं आणि मलाच तु दूर केलं. जमलं बरका तुला..!

कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे एवढं नात घट्ट पाहिजे.

कधीच कोणाची अर्धवट साथ सोडू नका.. मग ती प्रेमात असो किंवा मैत्रीत.. कारण प्रत्येक व्यक्तीचा अर्धा जीव त्यात गुंतलेला असतो..

आयुष्य जगायचं तर लहान मुलासारखा जगावं भेटलं तरी आनंदी आणि हातातून सुटलं तरी आनंदी.

लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही, नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच टिकतं.

Love Relationship Quotes in Marathi

Love life Relationship Status In Marathi

Download Image

पुढे जाऊन आपल्या नात्याला भविष्य नाही हे माहीत असून प्रेम करणं सोपं नसतं.

उत्तर देन अवघड नसत. फक्त वाद नको म्हणुन कधीतरी गप्प बसाव लागत चुक नसतानाही खुप काही ऐकुन घ्याव लागत. कारण ते नातं टिकवायचं असतं.

सात जन्म कोणी पाहिलेत? ह्याच जन्मी जगून घेऊन छान रुसवा फुगवा होतच राहील आयुष्यभर आपण हे नातं निभवू छान..

कुठल्याही नात्याची ओढ ना एकट्याला नसावी ती दोघांना असावी तेव्हाचं ते नात शेवट पर्यंत टिकत..!

आवडत्या व्यक्तीला हरवण्यापेक्षा गमावण्याची भीती जास्त वाटते कारण हरवलेलं एकदाचे भेटून जाईल पण गमावलेले पुन्हा कधीच भेटतं नाही..

Heart Touching Relationship Marathi Quotes

Download Image

नातं जपण्यासाठी एकमेकांच्या विचारांना जपणं फार गरजेचं असतं….!!

आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की, मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलते..!

नात्यामधील सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवरील विश्वास.

एका नात्याची भूक दुसऱ्या नात्यातून भरून निघत नसते. नात्याला रिप्लेस करायचं की रिपेअर हे आपण ठरवायचं.

रात्री झालेलं भांडण सकाळी विसरणारी नाती सर्वात जास्त टिकतात कारण तिथे दोघांमध्ये इगो नसतो..!

Couple Relationship Quotes In Marathi

Download Image

नात्याला कितीही वर्ष झाली तरी नात्यातली गोडी आणि प्रेम नेहमी बहरलेलं असावं.

प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेल अस नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजेत…!!

जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीलाच माहित असतं आवडत्या व्यक्तीने दुसऱ्या सोबत बोलल्यावर काय त्रास होतो..

नातं तेच असतं जिथे निर्णय तुझा माझा नाही तर निर्णय आपला असेल…!

जोडीदार हा चेहऱ्यापेक्षा मनाने सुंदर असावा कारण मनाची सुंदरता नात सुंदर बनवते..

Best Relationship Marathi Quotes

Download Image

दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्त्वाचं असतं मग ते प्रेम असो वा विश्वास.

नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही, कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम म्हणतात… हो ना !

एखाद‌या व्यक्तीला कितीही जीव लावा, पण त्या व्यक्तीच्या मनात दुसरीच व्यक्ती असेल तर तिथे आपली किंमत शुन्यच असते..

नातं कोणतं ही असल रुजतं तिथेचं जिथे त्या नात्याला वेळ आणि किंमत असेल.

परिस्थिती कशीही असो जोडीदार सांभाळून घेणारा असला की आयुष्यातले सगळेच प्रवास खास होतात..

एकच अपेक्षा आहे मला तुझ्याकडून जेवढ्या प्रेमाने नातं जोडलं तेवढ्याच प्रामाणिकपणे आयुष्यभर सात दे..!

नवऱ्याने जर बायकोला प्रेमाने आधाराने आयुष्यभर सगळ्या समोर ठेवलं ना तर कोणाची हिंमत होत नाही तिला वाईट बोलण्याची,

नाहीतर तुमच्या बायकोला सगळीकडून अपमान च सोसावा लागतो ज्याची बोलायची लायकी पण नाही ते ही बोलून जातात..

Time Relationship Marathi Quotes

जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती, नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा उचलू लागली, आता लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तर नाती बनवू लागली..!!

चांगला वेळ हा कुणाच्या सहवासात घालवायचा हे वाईट वेळ सांगते…

वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला वाटतं जपलं असत तर टिकलं असत… #नातं

चांगली व्यक्ती, चांगली नाती, चांगले दिवस आणि चांगली वस्तु यांची किंमत ना फक्त वेळ निघून गेल्यावरच कळते…!!

वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असते..

नातं कितीही खास असलं तरी त्यात असणारं आपलं महत्व काही वेळे नंतर कमी होतं हे तितकंच खरं..

सुखात ‘आनंद’ लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी करणारे लोकं जास्त महत्त्वाचे असतात..।।

परक्यांपेक्षा आपल्या माणसांनी मारलेली ठोकर, लय “कडक” असते… सावरता सावरता बरंच आयुष्य संपुन जातं…!

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की, एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे. तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा.. हे नातं एवढं काळ का जपलं..?

पडत्या काळात साथ सोडणारे आम्ही नाही आम्ही आजही आहे आणि उद्याही राहू. !

गैरसमज इतके शक्तिशाली असतात की, कित्येक वर्षे आपण निभावत आलेली नाती एका क्षणात तोडू शकतात.

माहिती नाही यार पण माझ्या सोबतच अस का होतंय मी सगळ्यांना सोबत एवढं चांगल वागूनही का मला कुणी समजून घेत नाही..!

जिभेने माफ करायला वेळ लागत नाही, पण मनापासून माफ करायला आयुष्य निघून जातं..!

Relationship Marathi Quotes

नातं कोणतंही असो त्याचा पासवर्ड एकच विश्वास.

नाती ही झाडाच्या पर्नासारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते….!

माणसं जपायची असतात वापरायची नसतात…

जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुस-यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही..!

छोटे छोटे प्रयत्न नात्यातला गोडवा वाढवतात

अशी नाती जोडण्यात काहीच अर्थ नसतो ज्या नात्यामुळे आपल्या जवळचीचं नाती आपल्या पासुन दुरावली जातील..!!

मानवी नातं जपण्यासाठी मी पणा सोडून कमी पणा घेतला की आपोआप आपले पणा वाढतो..!

आपल्या पोटात गेलेले विष हे फक्त आपल्याला मारते, पण तेच कानात गेलेले विष हे हजारों नाते संपवून टाकते म्हणून दुस-याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा…

ज्या नात्यात आदर नाही, त्या नात्याचं काहीच अस्तित्व नाही.

आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारणास्तव आलेली असते. या जगात अवास्तव अस काहीच नाही. जे कुणी भेटतं जिथे कुठे मन रमतं जिथे आपण मिसळून जातो. त्यांचं काहीतरी देणं लागतो. म्हणून तर आयुष्यात वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतात अन् आयुष्य बदलून टाकतात…!!

नात्याला नात्याची गरज असावी. पण नात्याची गरज कामापुरती नसावी…

काही लोकांना असं वाटतं की, आम्ही खूप चांगले आहोत.. पण तोंडावर गोड बोलून आणि मागे वाईट बोलणाऱ्याचे शब्द आपोआप कळतात.. म्हणून समोरील व्यक्तीच्या नजरेतून कमी होत जातात…!!

माझी चुक नसताना मी दोनच कारणासाठी सॉरी बोलते एक तर नात टिकवण्यासाठी आणि दुसर म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र शोधून मिळणार नाही..!

मैत्री सारख नात या जगात दुसर कोणत नाही..!

कधी चुक झाल्यास माफ करा पण कधी माणुसकी कमी करू नका, चुक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्यायचं पुस्तक आहे, गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका..!

राग माणसाला कोणत्याही टोकाला नेऊ शकतो त्यामुळं कोणावर जास्त वेळ राग धरून बसू नका…!!!

प्रत्येक नात्यात एक गमंत असते अवखळ मैत्रीसम ती जपायची असते बरंच काही सोडायचं असतं बरंच काही जपण्यासाठी, नातं टिकवण्यासाठी नात्या मधली सहजता आपुलकीने जपता आली पाहिजे…!

पैसा तर सर्वच कमवतात पण ज्यांनी नाती आणि मन जिंकले ते आयुष्यात कधीच हारत नाहीत…!

नातं जोडलं गेल्यावर आपल्यावर जबाबदारी असते समोरच्याने ठेवलेला विश्वास जपणं आणि समोरच्याच कर्तव्य असतं आपल्याशी एकनिष्ठ राहणं ज्यांना याची जाणीव असते त्यांचंच नातं अतुट होत जातं..

नात टिकवण्यासाठी संवाद साधणे खूप महत्त्वाचे असते..!

नात टिकवायचं असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका..कारण… जे प्रत्येक वाद जिंकण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा नाती गमावतात…

कोणत्याही नात्याची खरी परीक्षा तर “दुराव्यातच” असते…

कोणतही नातं टिकवण्यासाठी मनापासून केले जाणारे प्रयत्न हे दिलेल्या वचनांपेक्षा जास्त महत्वाचे असतात कारण फक्त आश्वासन देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो..!

कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये, असह्य झाल्यास अलिप्त व्हाव… पण उपदेशक होऊ नये.

Heart Touching Relationship Marathi Quotes

आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसाच नाही कामी येत, माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो..!

आपल्या सावळीपासून आपण शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे, शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातुन जपावे..!!

माणूस जोपर्यंत आयुष्यात आहे तोपर्यंत नात्यातला गोडवा, ओलावा, आपलेपणा, गाजवता येणारा हक्क जपता आला पाहिजे, जोवर तो आपला असतो…

नंतर ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर मागे फक्त कोरड्या आठवणी उरतात… आणि खोटा दिलासा देत देत आठवणींसोबत आयुष्य जगाव लागत… So जोवर ते आपले आहेत आयुष्यात आहेत तोपर्यंत भरभरून जपा…

संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी.. जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते..

नात! स्वीकार करण कठीण नसत. तर ते जपता येणं कठीण असत.

नातं तेच टिकते ज्यामध्ये शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो..!!

माझं आयुष्य किती आहे मला माहित नाही, म्हणून मी सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो. उद्या या जगात मी असेन नसेन तेव्हा माझ्या आठवणीने कुणा एका जरी व्यक्तिच्या डोळ्यात चार थेंब पाणी आले तरी मी स्वतः ला भाग्यवान समजेल.

काही काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं पण सख्ख्या नात्यात ओढा आढळत नाही..

परक्या ह्या दुनियेत कोणीतरी आपलं मी शोधून थकलो आहे, गुंतलो इतका मी जिंकण्यास नाती मी स्वतःस हरवून बसलो आहे…

नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकल की ते शब्दातून सोडवण कठीण असत…

प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही, तरचं नात्यात जिव्हाळा टिकून राहिलं..

पारिजातक लावता येतोच, मोगराही लावता येतोच. फक्त रोपं टिकली नाही म्हणून हार मानू नका. नात्याचही तसचं असतं.

एखाद्याचं बहरणं तुमच्या हातात आहे, ही किती पुण्याची गोष्ट असते. नात्यांचा सुगंध दिसत नाही, पण साथ कायम असली की त्या नात्याचा गंध नात्याला नेहमी दरवळत ठेवतो.

कधी कधी नात्याला नाव नको, पण एकमेकांच्या आयुष्यात वाव पाहिजे.

आपल्यांनी साथ सोडली म्हणून आपण जगायचं सोडायचं नाही. जग हे असच आहे इथे विश्वासाची काही किंमत नाही कोणी निस्वार्थीपणे नात निभावेल एवढी कुणाची हिंमत नाही…

नात्याचं महत्व हे मनात असलं पाहिजे जगाला दाखवण्यात काहीच अर्थ नसतो…

आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली..!! नातं संपलं..!!

आयुष्यात नाती इतकी छान निभावा की जेव्हा कधी एखादी व्यक्ती स्वतःच्या शेवटच्या घटका मोजत असेल तेव्हा सगळ्यात आधी त्या व्यक्तीला तुम्हाला भेटायची इच्छा झाली पाहिजे शेवटी नातं तेच जे शेवटच्या काळापर्यंत सोबत राहत.

नातं तिथेच तयार होतं.. जिथे काळजातून जपणं असतं.

शेवटी उरतात फक्त आपले त्याचं नाव म्हणजे “परिवार”!

समाप्ती.

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण “Relationship Quotes In Marathi” वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे रिलेशनशिप कोट्स संदेश पाहिले.

तरी या Relationship Quotes मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇

Leave a comment