100+ Emotional Quotes in Marathi | इमोशनल स्टेटस मराठी

Emotional Quotes In Marathi - इमोशनल कोट्स मराठी

Download Image

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. अशा अनेक प्रकारच्या भावनांवर आधारीत emotional quotes in marathi – इमोशनल स्टेटस आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

यात आम्ही love emotional quotes, sad emotional quotes, life quotes, short emotional quotes in marathi, self love quotes असे अनेक प्रकारचे इमोशनल कोट्स संदेश घेऊन आलो आहोत.

Best Emotional Quotes In Marathi – इमोशनल कोट्स मराठी

  • कुठला रस्ता, कुठल्या वाटा? थकून किनारी लागल्या लाटा..
    गुलाब शोधायला निघलो होतो, पायी रूतवून आलो काटा..
  • हसरे चेहरे, लाजरे चेहरे सारे वाटतात बरे चेहरे, मुखवट्यांमागे लपलेले सारेच नसतात खरे चेहरे…
  • एकांतात आलेले अश्रू हे खोटे नसतात…
  • आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकत. पण वेळे बरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही..!
  • मिळते तर या जीवनात खूप काही, पण आपण गिनती त्याचीच करतो जे मिळवता आले नाही…
  • प्रेमात एक गोष्ट सगळ्यात भारी असते, तो तिच्यामध्ये आईची माया शोधत असतो, आणि ती त्याच्यामध्ये वडिलांची सावली…
  • काही व्यक्तींच्या आठवणी सदैव आयुष्यात दरवळत राहतात ती व्यक्ती प्रत्येक्षात सोबत नसली तरीही..!
  • फक्त नातं तुटलं आहे नाहीतर माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे…
  • हळूहळू समजत चालय की आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही..!
  • लोक म्हणतात मुले मोठी झाली की बिघडतात, पन ज्या मुलांना घरच्या जबाबदारीची जाणीव असते ना ती मुले कधीच बिघडत नाहीत.
Emotional Quotes In Marathi

Download Image

जे घडायचे ते घडून गेले जवळचे दुःखात बुडून गेले मी सरणावर पडून होतो काल हसणारे आज रडून गेले..

मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खुप आहेत, पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणार पण कुणी नसतं…!

काहीही करा पण, आईला दुखावू नका.. तिच्या एवढं कोणीच करत नाही आपल्यासाठी..!

प्रवास खूप छोटा होता तुझ्यासोबत पण आठवणी मात्र कायम सोबत राहतील..!

Emotional Quotes On Life In Marathi

Download Image

आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की, आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल ? बस, त्या व्यक्तीसाठी जगायला शिका.

भलेही शिकलेली नसेल पण जगायच कसं हे आई शिकवते..!

चिडचिड असते मनात जरी, माझे प्रेमात पडणे मलाच माहीत. हसताना जरी दिसतो मी पण, माझे रडणे मलाच माहीत..

फक्त गाणी आवडतात म्हणून कोण ऐकत नाही, तर त्यामध्ये काही आठवणी लपलेल्या असतात म्हणून ऐकतात.

काही माणसं ही वाटसरू सारखी असतात. अचानकचं येतात आयुष्यात, पण कायमची हवी हवीशी वाटू लागणारी. आपण भरकटलेलो असतांना आपल्याला योग्य वाटेवर सोडून परत अनोळखी बनून जातात…

कोणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कोणी किती केलं हे लक्षात ठेवलं तर जगणं अगदी सोप्पं होतं..

Emotional Quotes

Download Image

आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलचं असं नाही, काही गोष्टींना आठवणीत ही जपून ठेवाव्या लागतं..!.

आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पाउलोपाऊली भेटतील.

“घर, शाळा, कॉलेज व ऑफिसमधली एक अशी जागा किंवा कोपरा असतो जिच्याशी आपण ‘इमोशनली अटॅच्ड’ असतो.”

प्रेम काय आहे…. जिथे मरण्यापेक्षा जास्त सोबत आयुष्य जगायचे वचन दिले जाते, जिथे राग आल्यावर वाद नाही तर संवाद घडविला जातो,

जिथे चुका झाल्यास एकमेकांवर औरडण्यापेक्षा एकमेकाला समजवले जाते,

जिथे छोट्या मोठ्या भांडणांनंतर एकमेकांना हसवलं सुध्दा जातं…!

हे असतं पुर्णत्वाचं प्रेम!

कोणी तुमच्या आयुष्यात मध्ये परत येईल या आशेवर कधीच बसू नका… कारण जे हरवलेत ते सापडू शकतात पण जे बद्दलेत त्यांना विसरावच लागत…

Emotional Relationship Thoughts In Marathi

Download Image

संकट येतात आणि निघून ही जातात पण, वेळेला बदललेली माणसे कायम लक्षात राहतात..!

प्लेटभर शिरा खाताना आपल्याला काजू, बदाम आणि बेदानेही दिसतात पण ज्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर कुठेच दिसत नाही… काही माणसे आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात, ती कधीच दिसत नाहीत, मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होते…!

लोक विचारतात मला माझ्या प्रत्येक वेळेस हसण्याच कारण, Because I’m Strongly Believe in… “ही वेळपण निघून जाईल”..!

या जगात कोणालाही तुमच दुःख ऐकायला वेळ नाहीये. हा पण तुमच्या दुःखाचा तमाशा चारचौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे एवढं लक्षात ठेवा बर का..

जिथे एक आनंदाचा खास क्षण निर्माण होतो, त्या हाताला लागलेला चटकाही प्रेरणादायी असतो.

Emotional sad Thoughts In Marathi

Download Image

आज मी पण अनुभवल, जवर आपल्यामुळे काम होतय तवरच लोक आपली असतात..!

शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो शरीर धकले की शांत झोप लागते आणि मन थकले की झोप उडते…!

एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतर वेळी जमणा-या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो.

तुमच्या जबाबदा-या तुम्हाला तुरुंगात टाकण्याआधी ही सुंदर दृश्ये तुमच्या डोळ्यात कैद करा.

एकांतात स्वतःशी बोलायचा प्रयत्न करा. कदाचित तुमचं सर्व ऐकणारा उत्तम मित्र मिळेल.

Emotional status in marathi

Download Image

एखाद्या व्यक्तीला मेसेज करायला मज्जा तेव्हाच येते जेव्हा ती व्यक्ती मेसेज सीन होताच टायपिंग करायला सुरु करते.

मनात काही भरून जगू नका नाहीतर मन भरून जगता येणार नाही…

आनंदी राहण्यासाठी एक जरी समजून घेणारा जीवापाड प्रेम करणारा असला कि अनेकांची गरज पडत नाही..!

खरय ना ? हक्काच्या व्यक्तीच्या एका स्पर्शात हजारो भावना दडलेल्या असतात.

या जगात सर्वात सुंदर भावना म्हणजे आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे हे पाहणं.

भविष्यकाळाचा एवढा पण विचार करत बसू नये, की वर्तमान काळातील सारं जगणंच राहून जाईल..!

Emotional status marathi

Download Image

एक रुपया एक लाख नसतो पण लाखातून एक रूपया काढला तर लाख राहत नाही..! (प्रत्येक गोष्टीला किंमत असते कोणतीच गोष्ट फालतू नसते)

स्तुतीमध्ये लपलेलं खोटं आणि टीकेमध्ये लपलेलं सत्य हे ज्याला समजले त्याने चांगलं आणि वाईट ओळखलेलं असत.

Sad Quotes In Marathi

कुणा वाचून कुणाचं जास्त दिवस अडत नाही, एका व्यक्ती साठी कोणीच आयुष्यभर रडत नाही,

खिसा रिकामा असल्यावर काळ कुत्र सुध्दा विचारत नाही, हातात जॉब नसल्यावर घरचे ही फुकट चारत नाहीत.

जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्व आहे माणसाचं, मेल्यावर तेरा दिवसापेक्षा जास्त कोणीही रडत नाही..!

एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हटलं आहे..

“श्वासासोबत एकटाच चालत होतो जेव्हा श्वास बंद झाला तेव्हा सर्व सोबत चालत होते”..

चेहर्यावर जरी आनंदी दिसत असलो तरी, मनातुन खुप तुटलेल्या आहे..

कितीही विचार केला तरी वेळेच्या पुढं जाता आलं नाही, ताटात कितीही असलं तरी भुकेपेक्षा जास्त खाता आलं नाही.

आपल्यालाच माहिती असतं “किती लढलोय जिंकण्यासाठी” लोकांना म्हणायला काय लागल “याला लढता आलं नाही”

Emotional Thoughts In Marathi

Download Image

डोळे पुसणार कोणी असेल तर, डोळे भरून यायला अर्थ आहे..

कोणाचेच डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे..

वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की, माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा होऊन जातो.

जगण्यासाठी संघर्ष नसतोच संघर्ष असतो तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि फक्त स्वाभिमानासाठी.

ज्यांच्यासाठी जे काही केलय, ते अगदी मनापासून केलंय, कुणाला कधी खोटी सहानुभूती नाही दिली पण वाईट एकाच गोष्टीच वाटतं, समजणारे खूप भेटले, पण त्यात समजून घेणारं कुणीच नव्हतं

“Reality..
जेव्हा आपण लोकांना महत्व देतो, तेव्हा त्यांना वाटतं आपण नेहमी फ्री असतो.. पण त्यांना हे समजत नाही, की आपण त्यांच्यासाठी स्वतःचे काम बाजूला ठेवून त्यांना जास्त महत्व देतो..

गुन्हेगार मी स्वतःचा झालो माझं नव्हत जे त्यासाठी मी बरबाद झालो, वागलो होतो स्वार्थ सोडून प्रत्येकाशी म्हणून च आज एकटा झालो.!

Sad Emotional Quotes In Marathi

Download Image

आयुष्यात एकदा तरी एकटे पणाची जाणीव होणं गरजेचे असतं, त्या व्याकूळ अवस्थेत आपली स्वतःशी ओळख होणं गरजेचं असतं..

काही लोक अचानक शांत होतात कारण, स्वतःला सिद्ध करायच्या धडपडीत, त्याचं मन थकलेलं असते.

कौतुक अनेकवेळा, परक्या लोकांकडून होते, आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यात जातो..!!

आपलेच लोक आपले वैरी झाले की, आपल्याला हळू हळू हरल्याची जाणीव होते.

सहनशक्तीची मर्यादा ओलांडली की माणूस एकदाच बोलतो, सगळंच बोलतो आणि पुन्हा त्या नात्यात वळून बघत नाही.

जेव्हा आपल्यावर वेळ येते ना तेव्हा कळत आपला आधार फक्त आपणच आहे दुसर कोणी नाही..!

Sad Emotional Quotes On Life In Marathi

Download Image

मौनात दडलेला अर्थ आणि शांततेत लपलेला आवाज सगळ्यांनाच कळत नाही..!

एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो.. कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात..

थवा सुटलेला पक्षी जसा फिरतो सैरभैर अनोळख्या गर्दीत ओळख शोधत तसं बावरत राहतं. होईल सवय म्हणता म्हणता संपतो दिवस मनातलं गाव शहरात स्वतःला सावरत राहतं!

समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे.

आम्ही वाईट वेळ बघितल्या त्यामुळ कोणाचं वाईट व्हावं असं वाटत पण नाही आम्हाला..!

जबाबदारी अंगाशी आली की न आवडणारी कामं पण मजबुरीने करावी लागतात..!

Sad Emotional Quotes

Download Image

जबरदस्तीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला..!

मी प्रॉब्लेम्स ना कधीच शोधत नाही पण त्यांना मीच कसं काय सापडते कोणास ठावूक.

कित्येकवेळा आपण इतरांची मन जपताना स्वतःच्या मनाला दुखावत असतो…

लुबाडून खाणारा चार दिवस सुखी असतो. आणि कष्टकरणारा कायम स्वरूपी सुखी असतो.

एक दिवस सगळ्यांच्या स्टोरी वर माझाच photo असणार आणि Caption असणार..

भावपूर्ण श्रद्धांजली / RIP

प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला शक्यतो गरज संपल्यावर नाकारलं जातं…

Sad Emotional status in marathi

Download Image

आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला Forward करायचा Option नसतो.

सगळेच विषय सांभाळणारी वही ‘रफ’ म्हणून ओळखली जाते तिला ना सुंदर बाईडिंग असते ना सुंदर कव्हर, कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण अशीच अवस्था असते.

एका मर्यादेबाहेर त्रास सहन केला की माणूस शांत होतो. त्यानंतर… ना तो कोणाकडे काही तक्रार करतो, ना कोणाकडून कसली अपेक्षा ठेवतो…

व्यक्ती बदलत नसते त्याला आलेले चांगले वाईट अनुभव त्याला बदलायला भाग पाडत असतात.

दुःखाला थोडसं आपलं केलं की, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात, अन् होणारा त्रास ही कमी होतो.

बदल प्रत्यक्ष अस्तित्वात येईपर्यंत काही बदललंय असं वाटतच नाही. तोच काळ खडतर कसोटीचा असतो.

Sad Emotional status marathi

Download Image

अंधारात सोबत असणारा काजवा फार महत्त्वाचा. अंधार मिटल्यावर मात्र काजव्यांन तिथं थांबू नये, अंधारात त्याला मिळणार महत्त्व आता मिळणार नाही.

दुनिया खूप व्यस्त झालीय त्यामुळे आपल्या असण्या नसण्याने कुणाला फरक नाही पडत म्हणून अपेक्षा करणं सोडून द्या…!

तुझ्यासाठी पावसाळ्यात एकट्या पडलेल्या उन्हाळ्याच्या कवितेसारख कधीच वाटून घेऊ नकोस तू मी जपून ठेवलय थोडस ऊन्ह माझ्या काळजात तुझ्यासाठी..

जबरदस्तीच्या सहवासापेक्षा, स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला..!

नाती बिघडण्याचे एक कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त..!

असणा-या गोष्टी जेव्हा नाहीश्या होतात तेव्हा त्या गोष्टीची किंमत कळते..!

Short Emotional Quotes In Marathi

Download Image

कधी कधी स्वतःची खूप आठवण येते, कसा होतो नी काय अवस्था झाली माझी..!

किती बदल झालाय ना आपल्या नात्यामध्ये आधी एकमेकांना बोलल्या शिवाय दिवस जायचा नाही आणि आता साधा एक Call पण नाही.

वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत…!

माणूस किती निर्लज्ज बनतो ना प्रेमात समोरची व्यक्ती तिच्या वेळेनुसार बोलत असते तरी आपण एका सेकंदा मध्ये तिला उत्तर देतो स्वताः:ची रिस्पेक्ट गमावून फक्त तिच्यासाठी..!!

तुझी आठवण अशी आहे जी कधी माझ्या चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी…!

Emotional Quotes On Life In Marathi

Short Emotional Quotes

Download Image

आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अश्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आणि महत्व आहे..!!

Positive Thoughts In Marathi

एक पराभव किंवा एक विजय कोणाचं आयुष्य ठरवत नसतो..!

जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तो पर्यंतच ते अर्धा संपून गेलेले होतं.

आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असत..! आणि काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असतं..!!

कधीकधी खूप आवडणाऱ्या गोष्टीसुध्दा, हसत हसत सोडाव्या लागतात आयुष्यात..!

आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा..

भावनात्मक सुविचार

Download Image

कोणी तुमच्या गाण्याला कितीही नाव ठेऊद्यात पण तुम्ही तुमच्या आयुष्याचं गाणं गुणगुणत राहा….!

पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने, शिकवलेले धडे जास्त लवकर समजतात..!

आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडाची एक वेळ असते देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल टाकत चला..!

आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्या कडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असतं..!!

सरलेल्या आयुष्यात ही थोड्या आठवणी आहेत, सुखाचे क्षण जरी विसरले तरी आठवणी सोबतीला आहेत..

माणसाला स्वतःचा photo काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची image बनवायला आयुष्य लागतो.

आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते.

जबाबदारी

किती छोटा शब्द आहे वाचायला एक सेकंद लागतो पण पार पाडायला आयुष्य निघून जातं..!

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश राहा आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका..

सहन करायची सवय एकदा झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही..

माझं नशीब खुप वाईट आहे. जीव तर मनापासून लावतो, पण शेवटी सगळेचं साथ इन देतात माझी.!

दगडाचं काळीज असणाऱ्या लोकांना बोलण्यात काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा आपल्याच काळजावर दगड ठेवून राहिलेलं कधीही बरं असतं.

काय झालं…?

विचारणारं कोणी तरी आयुष्यात पाहिजे !

Short Emotional Quotes In Marathi

भूतकाळ सुखाने जगू देत नाही भविष्याकडे नव्याने बघू देत नाही..

एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली, कि दुसरीकडे कुठेच मन लागत नाही..

कोणीतरी असा पाहिजे जो “मन” आणि “मौन” दोन्ही समजेल..!!

घरापासून लांब रहायला लागलं की माणूस आपोआपचं strong होतो.

भावनांनी जोडलेल्या नात्यातले दुरावे आधिक त्रासदायक होतात.

जीवनात दुःखाच्या पाठोपाठ सुख आणि सुखाच्या पाठोपाठ दुःख हे येतंच असत..!

स्वतःच्या दुःखावर ही आपल्याला हसू यावं एवढं आपलं मन मोठं असावं..

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

गरज लागली की या, माणुसकी जिवंत आहे माझ्यात अजून..!

व्यक्तीपेक्षा ‘भावनांची’ सवय जास्त असते!

ज्यांना खेळणी कमी पडली, ती माणसांशी खेळून गेली.

उंच आकाशात भरारी घेणारी पाखरं, नात्यांच्या बंधनात बांधलेली नसतात.

आवडत्या व्यक्तीचा सहवास कितीही मिळाला तरी तो कमीच असतो…!

भेटणं पाच मिनिटांचं का असेना फार सुख देऊन जातं..!

राग नाही माझा कोणावर पण काही जन असे वागतायत ना मग नाही होत इच्छा बोलायची..

मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही..!

ज्यांच मन चांगल असत ना नेमक त्यांचच नशीब खराब असतं..!

नाराज नाहीये मी तुझ्यावर काही गोष्टी आहेत ज्या हृदयाला लागल्यात.!

आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं.

कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणच योग्य असतं..!

अहंकारामूळे देखील अनेक नाती तुटतात. प्रत्येक वेळी फक्त चुकाच कारणीभुत नसतात.

माणसाने परिस्थिती आणि वेळ बघून स्वतःला बदलायला हवं. It’s Time To Update & Upgrade

भावनात्मक सुविचार

कारण नसतानाही देवासमोर हात जोडणा-या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही.

निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला आपसुक येत नसतात..

अहंकारात तीन गेले धन, वैभव आणि वंश, खोट वाटतं असेल तर आठवा ! रावन, कौरव आणि कंस !

फक्त इतकचं प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माच फळ मिळेल..

तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नव्हे..!

जोपर्यत आपण जशास तसे वागत नाही तो पर्यत समोरच्याला शहाणपण येत नाही..!

एखाद्या सोबत नातं जोडण सोप्प असतं पण त्याच नात्याला सांभाळणं म्हणजे त्याहून अवघड असतं..!

नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना उगवेल तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसवाना.

कोठल्याही व्यक्तीला चुकीचं समजण्या पहिले एक वेळा त्या व्यक्तीसोबत मनमोकळे पणाने बोलून पहा, कदाचित आपला गैरसमज दूर होईल…

जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुस-याकडणं मागणं बंद करा कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळला ना.. त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही..!

आपल्याला फक्त एवढंच कळत आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे..!

पर्याय म्हणुन आपली निवड असेल तर, त्या नात्याचं ओझ वाहणं तिथंच थांबवल पाहिजे…!

सुखाची नशा चढली कि, स्वतः शिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात…

जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र-मैत्रिणी तुटलेले असतात.

ज्यांनी ज्यांनी आपली वेळ पाहून साथ सोडली ना त्यांना एक ना एक दिवस पश्चाताप नक्कीच होणार..!!

आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीकडून “सॉरीची” अपेक्षा नसतेच, फक्त त्या व्यक्तीने परत तीच चूक करु नये, एवढीच अपेक्षा असते..!

आयुष्यात स्वतः सोबत कसही वागा पण ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय ना त्यांचा विश्वासघात कधीच करू नका..!

खोट्यालाही एक वेगळीच चव असते, स्वतः बोललं तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू वाटते..!

एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या आयुष्यात विघ्न आणून जर कोणाला आनंदी होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो..!

शेवटी जिंकलास रे देवा तु विसरली ती मला. मला फक्त एवढंच सांग की मला हारवून तुला तरी काय मिळालं..?

डायरीत मनाच्या जपले स्वतःला कोमेजलो नाही सुचावीच कविता नेहमी असा कधी हट्ट केला नाही, प्रेम वाटलं, प्रेम स्वतःवरही करायला शिकलो शेवटी आलिंगन दिले जगण्याला फास घट्ट केला नाही !

लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतःहून संपवतात..!!

नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. वर्तणूकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही ग्रॅनाईट वर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित व अजरामर राहते …

समाप्ती.

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण emotional quotes in marathi वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे इमोशनल कोट्स संदेश पाहिले.

तरी या emotional quotes मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇

Leave a Comment