125+ Best Life Quotes In Marathi | जीवनावर मराठी स्टेटस

Best Life Quotes In Marathi

Download Image

आपल्या आयुष्यात चाललेल्या सुख दुःखाला व्यक्त करण्यासाठी जिवनात आधारित उत्कृष्ट असे मराठी स्टेटस – life quotes in marathi आम्ही घेऊन आलो आहोत..

माणसाचे आयुष्य म्हणजे चढ उताराचा खेळ.. यात कधी आनंदाचे वारे तर कधी दुःखा चे वादळ येतच असतात.. म्हणूनच तर या चालत राहणाऱ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या मनांत काही चांगल्या आठवणी तर काही वाईट आठवणी घेऊन पुढे जात असतो..

अनेकदा आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखां ना आपण एकमेकांसमोर व्यक्त होत असतो.. मात्र आत्ताच्या डिजिटल काळात आपल्या मनाला व्यक्त करण्याची पद्धती डिजिटल झाली आहे.. अशा ह्या डिजिटल काळात आपल्या आयुष्यात चाललेल्या सुख दुःखा ला व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेक जीवनावर आधारित विचारांची गरज असते.

जीवनावर आधारित असेच उत्कृष्ट स्टेटस, कोट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत..

यात तुम्हाला जीवनावर मराठी स्टेटस, life quotes in marathi, life status in marathi, sad Life Quotes in marathi, positive life quotes in marathi असे अनेक प्रकारचे जीवनावर आधारित सुविचार देण्यात आले आहेत..

जीवनावर मराठी स्टेटस | Life Quotes In Marathi

Success Quotes In Marathi

Download Image

“संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.”

🙏 जय श्री राम 🙏

जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो, तो कधीच कोणत्याच परिस्थितीत हारत नसतो.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, हे मात्र आपल्या हातात असते..

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”

आयुष्य इतक्या आनंदाने जगा की, जेव्हा इतर लोक तुमच्याकडे सहवासात येतील तेव्हा ते देखील आनंदी होतील..

जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

माणसाच्या आयुष्यात संकटं आली नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही, ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या..

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन..

कधीकधी संपूर्ण दिवसातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दोन खोल श्वासादरम्यान घेतलेली विश्रांती.

स्वतःवर प्रेम करणे हीच खरी आयुष्यभराच्या प्रवासाची सुरुवात आहे.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. यात टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतात.

आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

जर तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकत नसाल तर छोट्या गोष्टी मोठ्या पद्धतीने करा.” – नेपोलियन हिल

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा..

आयुष्याचा रथ योग्य मार्गावर घेऊन जाणारा स्वयंप्रकाशित श्रीकृष्ण स्वतःच स्वतःलाच होता आलं पाहिजे.

फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे…!!

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

आयुष्यात मरण हे जरी अंतिम “सत्य” असलं तरीही जगण्यासाठीची “धडपड” ही करावीचं लागते.

Life Status In Marathi – जीवनावर मराठी स्टेटस

पराभव विसरायला अन् अपमान पचवायला शिकलेला एखादा माणूस, आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत समोर जातो.

सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत असंख्य धडे तर आयुष्यच शिकवत असत.

तुम्ही चालत असलेला रस्ता तुम्हाला आवडत नसल्यास, दुसरा रस्ता तयार करा.

जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टी – तुमचे आरोग्य, तुमचे ध्येय आणि तुमचे आवडते लोक.

जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करण्याइतपत धाडस करत नाही तोपर्यंत तुम्ही खूप काही करू शकणार नाही.

यश म्हणजे नऊ वेळा पडणे आणि दहा वेळा उठणे.

संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही… तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो…!

कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

मी माझे उर्वरित आयुष्य माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम बनवण्याचा निर्णय घेतो.

समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतो.

Life मध्ये काही शिकलो नाही
पण life ने खूप काही शिकवले.

जबाबदा-या अंगावर पडल्या की आयुष्यातून “कंटाळा” नावाचा शब्द निघून जातो.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने
देव तुम्हाला देईल.

आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो.

जगत असताना खरंच आपण आपलं आयुष्य जगतोय का..? ह्याचा विचार न करणारे आपण मरताना मात्र स्वतःला म्हणतो की, आणि जरा स्वतःसाठी जगायला हवं होतं.

संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – एपीजे अब्दुल कलाम

कोणी तरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठे तरी चुकतोय !

Sad Life Quotes In Marathi

माणसं ओळखण्यात झालेली चुक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं.

जसा सूर्य उगवणे निश्चित तसेच मावळणेही …. प्रतेकाचे जीवनाच्या वाटेवर ही असेच आहे कधी उगवणे तर कधी मावळणे.स्वतःला समजावत राहचे. हे ही दिवस जातील. आनंदात किंवा दुःखात हेच आठवायचे..

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.

माणूस मोठा विचित्र आहे, सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळत बसतो.

नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते, मेहनत करूनच ते उघडावे लागतात..

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं.

आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीचं लागणार आहे…!!!

माणसाच्या आयुष्यात अशीही वेळ येते जेव्हा त्याला त्याच्या प्रामाणिकपणावर सुद्धा पस्तावा येतो..!

मृत्युला घाबरण्यापेक्षा आयुष्य न जगण्याला घाबरायला हवं.

वाईट विचारांच गवत आपोआप उगवते चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात.

आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते, शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघङते.

आयुष्य म्हणजे काय किती कशासाठी कोणासाठी हे माहीत नसताना ही जो दिवस उगवतो तो मावळतो हे नियतीचे चक्र उघड्या डोळ्यांनी पहाणे म्हणजे आयुष्य…

Enjoy Life Quotes In Marathi

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेल आयुष्य भरभरून जगा..!

आयुष्याच्या चित्रपटात कोणताचं क्षण पुन्हा येतं नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला…!

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर ते एखाद्या ध्येयाशी बांधा, लोकांशी किंवा इतर गोष्टींशी नाही..

उपयुक्त गोष्ट करणे, धाडसी गोष्ट सांगणे, सुंदर गोष्टीचा विचार करणे: एका माणसाच्या आयुष्यासाठी हे पुरेसे आहे.

आयुष्यात पैसा नसला तरी चालेल पण, प्रामाणिक पणा नक्किच असायला पहिजे..

आयुष्य एकदाचं आहे.. दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा.. स्वतःच्या दुनियेचे मालक व्हा…

आपल्या जीवनाचा उद्देश आनंदी असणे आहे.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Positive Life Quotes In Marathi

आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते फक्त विचार Positive पाहिजेत..

या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की, ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरुन जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो.

फांद्या राहिल्या तर पानेही येतील, वाईट दिवस आले तर चांगले दिवसही येतील..!

जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील !!

आयुष्यात कितीही अपयश पदरी पडलं तरी काळजी नाही, कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते..

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे हे आपल्या हातात आहे..

जे योग्य आहे ते करण्याची वेळ नेहमीच योग्य असते.

आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जीवन जगतो..

माझी आई नेहमी म्हणायची, आयुष्य हे चॉकलेटच्या डब्यासारखं आहे. तुम्हाला काय मिळणार आहे हे कधीच कळत नाही.

जीवनात संधी कोणत्या ना कोणत्या रस्त्याने येत असते फक्त त्या संधीच सोनं कसं करायचं हे आपल्या हातात असतं…!

तुम्ही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यास, तुम्ही ज्या गोष्टी पाहता त्या बदलतात.

सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते…

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर स्वतः कामं करन..

जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल.

आयुष्य हसत आणि हसवत जगा काय माहित.? आयुष्याच्या कोणत्या वळणावर मृत्यू आपली वाट पाहत उभा असेल.

कानावर आलेली निंदा मनावर न घेता आयुष्य जगायचं, अपमानाचं उत्तर स्वाभिमानाने यश मिळवून जगाला द्यायचं.

आयुष्य मोगऱ्यासारख असायला हव जिथे जायचं तिथे दरवळत राहायचं.

उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो.

आयुष्यात कितीही वाईट दिवस येऊ द्या, कितीही संकटं येऊ द्या पण या दोन गोष्टी कधीच सोडू नका “आशा आणि विश्वास”..

Alone Life Quotes In Marathi

जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसुन उठून परत एकदा नव्याने सुस्वात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानेच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते..

वेळ बदलत आहे, तश्या गोष्टी पण बदलत आहेत, लोकं आयुष्यातून निघून जात आहेत एकटेपणा चांगला वाटू लागलाय आणि मी शांत होत चाललोय…!

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

कर्तृत्व अफाट असलं की, आयुष्य राजेशाही थाटात जगता येत.

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी असते..

खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं…

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा
हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.

सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला महान व्हायला सुरुवात करावी लागेल.

काही चांगली माणसे आयुष्यात आली आणि काही वाईट माणसे देखील आली पण लक्षात वाईट माणसे जास्त राहिली कारण त्यांनी “चांगले” अनुभव दिले.

“मी ठीक आहे” या एका वाक्या मागे आयुष्यातील अनेक दुःख आणि वेदना लपलेल्या असतात..!!

भातुकलीच्या खेळात रमणारं बालपण कधी, आयुष्याच्या खेळात गुंफायला लागतं, नाही कळत हो माणसाला.

आपल्याला मोबाईल मधून बाहेर पडल्यावर कळतं की आपल्या जीवनात किती प्रश्न आणि अडचणी आहे बरोबर ना…!

हिऱ्याची ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

Life Quotes In Marathi Text

व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका ना ईलाजा स्वतः साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य.

आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून..!

आजच्या दिवसाचा भरोसा नसताना उद्याच्या दिवसाची अपेक्षा करायची कशाला..? मोकळ्या हाताने जगातून जायचे असताना पैसा, मालमत्ता आणि नश्वर जीवनाचा गर्व करायचा कशाला..?

तुमची स्वप्न हे इतरांपेक्षा वेगळी असतील तर तुमच्या जीवनात अडचणी आणि अडथळे हे इतरांपेक्षा जास्त येतील हे लक्षात ठेवा..

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते..

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

आयुष्यातील अनेक अपयशी असे लोक आहेत ज्यांना हे समजले नाही की त्यांनी हार पत्करली तेव्हा ते यशाच्या किती जवळ होते..

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

वेळेनुसार रंग बदलणारे सरडे ओळखायला शिका आयुष्य खूप सोपं होईल..

आयुष्यात कधी कधी सोपा रस्ता सोडून अवघड पायवाटेने चालणं सोईच असतं..

Love Life Quotes In Marathi

प्रेम असं करायचं की आयुष्य कमी पडलं पाहिजे एकमेकांसाठी जगताना.

जीवनाचा प्रवास हा आपल्याला साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा कारण असे लोक स्वतः ही यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी करतील.

आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका. कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो..

इतरांवर प्रेम करणे आणि मिळवणे हे मनुष्याचे जीवनातील सर्वात मोठे सुख आहे!

काही माणसं आयुष्य असतात पण आयुष्यात नसतात..

आयुष्य हे शिकवते की सर्वांशी नाते जपा पण कोणाकडून अपेक्षा ठेवू नका.

थांबण्यापासून थांबवणारं कोणीतरी हवं आयुष्यात

जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते, जे स्वतःसोबत दुस-याच्या ही आनंदाचा विचार करतात…

तुम्ही इतर लोकांशी कसे वागता हे तुमच्या यशाचे सर्वात महत्त्वाचे अंगण आहे या वस्तुस्थितीकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.

जीवनात उतार-चढाव येणारच सोबत फक्त साथ देणारं कोणी तरी हवं.

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

समाप्ती.

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण आपल्या जीवनावर अर्थात आयुष्यावर आधारित खुप सारे स्टेटस, quotes, सुविचार पाहीले. यात आम्ही आपल्याला प्रेरणा देणारे Life Quotes in Marathi, मोटीवेशन देणारे Life quotes In Marathi तसेच Sad Life quotes in marathi, positive life quotes in marathi, enjoy life quotes in marathi असे अनेक प्रकारचे जीवनावर आधारित स्टेटस, quotes सुविचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे..

तरी यात तुम्हाला जीवनावर “आधारित स्टेटस – life quotes in marathi” पैकी कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇👇

Leave a Comment