125+ Best Good Positive Thoughts In Marathi | सकारात्मक मराठी सुविचार

good thoughts in marathi

Download Image

आयुष्यात आलेले संकट, दुःख, निराशा या सगळ्यातून आपल्या विचारांना सकारात्मक दृष्टिकोनात बदलण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Good Positive Thoughts In Marathi – सकारात्मक मराठी सुविचार

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी अशी वेळ येते जेव्हा त्याला सकारात्मक अर्थात positive विचारांची खुप गरज असते. आयुष्यात आलेले संकट, दुःख किंवा निराशा या सगळ्यातून आपल्या एक “सकारात्मक विचार” बाहेर काढण्यासाठी पुरेसा असतो.

“Positive Thoughts – सकारात्मक सुविचार” आपल्याला नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करतं असतात.

म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये Good Positive Thoughts in Marathi – सकारात्मक मराठी सुविचारांचा एक उत्कृष्ट संग्रह घेऊन आलो आहोत..

Good Thoughts In Marathi | मराठीतील उत्कृष्ट असे चांगले विचार

मनात राम आणि हाताला काम जर असेल तर कधीच वाईट विचार मनात येत नाहीत.

सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला कोणतेच विष मारू शकत नाही आणि नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला कोणतेच औषध वाचवू शकत नाही.

जेव्हा सगळं संपलं असं वाटेल तेव्हा अधिक खंबीर व्हा ! पुरंदरच्या तहात रक्ताचं पाणी करून जिंकलेले २३ किल्ले मुघलांना दिल्यावर स्वराज्य संपलं ! असं सगळ्यांना वाटलं होतं…. फक्त शिवराय वगळता !

Best Shatrapati Shivaji Maharaj Quotes

फक्त एकदा सिद्ध व्हा प्रसिध्द व्हायला वेळ लागणार नाही.

thoughts in marathi

Download Image

प्रयत्न सोडू नका आज ना उदया नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येईल.

जोपर्यंत तुम्ही तुमचे पंख पसरवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही किती उंच भरारी घेऊ शकता.

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो, त्यालाच यशाचा मार्ग सापडतो.

Sakaratmak Vichar Marathi

Download Image

तुमच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयी तुम्हाला एक दिवस खूप मोठ्या चांगल्या परिवर्तनाकडे घेऊन जातील.

फक्त जिद्द ठेवा..! आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते.

“मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल…”

Positive Vichar

Download Image

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

For More : Emotional Quotes 

परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की, परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो…

वाचन करा. वाचनाने प्रगल्भता वाढते, दृष्टिकोन विकसित होतो, शब्दसंग्रह वाढतो, संभाषण कौशल्य विकसित होते, व्यक्तिमत्व विकसित होते.

positive thoughts in marathi

Download Image

आपले अस्तित्व आपल्या कर्मापासुन आहे, इतरांच्या दृष्टीकोनातून नाही…!

Karma Quotes

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही.. मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..

मेहनत जास्त करा, अवघड लक्ष्य सुद्धा सोपे वाटेल.

Positive Thoughts in Marathi

Download Image

उद्याच्या चिंतेत आजचा दिवस खराब करू नका. आणि आजचा दिवस जगताना उद्याचे नियोजन करायला सुद्धा विसरू नका. वर्तमान आणि भविष्य याचा योय ताळमेळ घालणे हे कौशल्यच आहे.

मोठमोठी संकटे हि तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी मिळालेली संधी असते.

आपल्या चष्यातून जगाकडे कधीच पहायचं नसतं. आपल्याला हवं तसं लोकांनी वागावं हि अपेक्षाच चुकीची आहे.

Good Positive Thoughts in Marathi

Download Image

अंतिम ध्येय्यासोबतच प्रवास सुद्धा महत्वाचा असतो. प्रवासाचा आनंद घ्या.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु, आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?

यशाचा मार्ग आनंद आणि समाधानातूनच पुढे जात असतो.

motivational thoughts in marathi

Download Image

“आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा विचारांचा असतो, एकदा का तुम्ही तो पार केला तर तुम्ही काहीही करू शकता.”

कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे ‘काय नाहीये’ यापेक्षा ‘काय आहे’ आणि त्याच जास्तीत जास्त चांगला वापर कसा करून घेता येईल याचा नेहमी विचार करा.

प्रत्येक दिवस हा चांगला नसतो परंतु प्रत्येक दिवसामध्ये “काहीतरी” नक्कीच चांगले असते.

morning thoughts in marathi

Download Image

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.

लहान लहान बदलांच्या माध्यमातून मोठे परिणाम साधता येतात.

आपलं बालपणच छान होतं, निदान चेहऱ्यावरचं हसू तरी खरं होतं..।।

love thoughts in marathi

Download Image

आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वोत्तम संपत्ती.

कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. आपले विचार त्या गोष्टीला चांगले किंवा वाईट ठरवतात.

आपला MINDSET आपलं आयुष्य कसं असावं हे ठरवत असतो.

life thoughts in marathi

Download Image

अपयश ही एक संधी असते, पुन्हा नवीन सुरुवात करण्याची आणि ते देखील आधी पेक्षा जास्त ज्ञाना सोबत.

यश अपघाताने मिळत नाही अपार मेहनत, धाडस, योग्य निर्णय, दूरदृष्टी याचा एकत्रित परिणाम परम यशाच्या रुपाने मिळत असतो.

यशस्वी लोकांच्या यशामागचे कारण म्हणजे त्यांना अशा गोष्टींचे ज्ञान असते ज्याचे ज्ञान सामान्य लोकांना नसते.

happy thoughts in marathi

Download Image

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात खाली पडते, परंतु पडल्यानंतर जमिनीवर लोळत रहायचं कि उठून पुन्हा चालायला सुरवात करायची हे आपलं आपणच ठरवायचं असत.

तुमच्यावर आलेला “प्रसंग” तुमचे आयुष्य ठरवत नाही परंतु त्या प्रसंगात तुम्हीँ घेतलेला “निर्णय” तुमचे आयुष्य ठरवतो .

लक्ष्य निश्चित करणे ही अदृश्याला दृश्यात बदलण्याची पहिली पायरी आहे.

good thoughts in marathi text

Download Image

असामान्य गोष्टी नेहमी अशा ठिकाणी लपलेल्या असतात जिथे लोक कधीही पाहण्याचा विचार करत नाहीत.

लोक माझ्या कल्पना चोरतात याचे मला वाईट वाटत नाही तर त्यांच्याकडे स्वत:च्या कल्पना नाहीत याचे वाईट वाटते.

– निकोला टेस्ला

सकारात्मक विचार | Positive Thoughts In Marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

good thoughts in marathi short

Download Image

तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यशच घेईन, त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न करत रहा.

संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थिती मधून जावे लागते.

जीवनामध्ये तुम्हाला टोचून बोलणारा समजावून सांगणारा असेल तर त्याचे उपकार माना कारण ज्या बागेत माळी नसेल ती बाग उध्वस्त होते.

good thoughts in marathi for students

Download Image

स्वतःसाठी ऊर्जेचा स्रोत शोधा. आपले शरीर, मन, विचार नेहमी प्रसन्न आणि चैतन्यमय ठेवा.

भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका देवाचं नकळत का होईना लक्ष आहे आपल्यावर आपण फक्त नीतिमत्ता भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका.

तुमचा कठोर संघर्षच तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो.

good thoughts in marathi (4)

Download Image

स्वतःच आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.

पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.

Best Life Quotes

माणूस केव्हा ही जिंकू शकतो फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं.

good thoughts in marathi (3)

Download Image

योग्य वेळ आल्यावर तुमच्या नशिबात असलेलं सर्व काही तुम्हाला मिळेल.. कारण आयुष्य नशीबावर चालते.. कितीही डोकं चालवलं तरी, बिरबल राजा होऊ शकतं नाही..

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते

देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे… दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र, व्याजासकट वसुल केल्याशिवाय सोडतही नाही..!

good thoughts in marathi (2)

Download Image

आपण कशात उत्कृष्ठ आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, नाहीतर दिशाहीन प्रवास सुरु होतो.

कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा. कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते.

संकट कितीही मोठं असुधा त्याला सामोरे जाण्याची जिद्ध असली पाहिजे.!

good thoughts good life in marathi

Download Image

यश आणि अपयश ह्या आपल्या विचार पध्दतीवर अवलंबून असते.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.

Good Thinking in marahti

Download Image

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाही..!!

झाड तोडलं आणि खोड जरी बाकी राहिलं तरी नवीन पालवी फुटते तसंच नात्यात काही गोष्टी तुटल्या तरी नातं तुटत नसतं. ते परत जीवंत होतचं !

जेव्हा एखादी गोष्ट करण्याची इच्छा विवेकातून येते तेव्हा कोणतीही अडचण त्याला रोखू शकत नाही.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्यामधुन शिका आणि पुन्हा सुरवात करा.

आजकालची परस्थिती पाहता रात्री कोणताही विचार न करता ज्याला लगेच झोप लागते तोच खरा श्रीमंत म्हणावं लागेल..

स्वप्न पाहण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण ते पूर्ण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते हि किंमत मोजण्याची तयारी असेल तरच तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतील..

इच्छाशक्ती बऱ्याच नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवून देत असते.

यश म्हणजे दिवसेंदिवस वारंवार केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज.

विजय असो किंवा पराभव कायमस्वरूपी काहीच नसतं कायमस्वरूपी असतात ते आपले प्रयत्न, जे आपल्याला सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्य करत असतात..

वेगवेगळे प्रयोग करत राहणे आणि चांगल्या वाईट परिणामांसाठी कायम तयार राहणे यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाब आहे.

कृतज्ञता अंगी बाळगा. लोकांचे मनमोकळेपणाने आभार माना. कृतज्ञता आदर मिळवून देत असते.

आपलं यश अपयश इतरांच्या नजरेतून कधीच बघायचं नसतं. आपल्या यशाचे परिमाण आपण स्वतःच ठरवायचे असतात.

दहा गोष्टींमध्ये “सामान्य” राहण्यापेक्षा, एक गोष्टीमध्ये “महान” बना..

दहा वर्षांमध्ये आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं, पण त्यासाठी धरसोड वृत्ती सोडून एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

अपयशी मार्ग पुन्हापुन्हा वापरू नका, यश मिळवायचे असेल तर नवनवीन मार्ग शोधा.

यश हे एकाच रात्रीत मिळत नाही.. त्यासाठी कित्येक रात्री जिद्दीने काम करत राहावं लागतं.. तेव्हा कुठे एक दिवस असा येतो की, यश आपल्या समोर उभं असतं..

“अपयश” आणि “तणाव” सहन करण्याची ताकत ज्यांच्यामध्ये असते त्यांना यश हे मिळतंच.

स्वतःच्या मर्यादा निश्चित करू नका, मर्यादांना झुगारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

आपले जग हे आपल्या विचारांनी तयार होत असते. जसे आपले विचार तसे आपले जग.

डुप्लिकेट कधीच ओरिजिनल ची बरोबरी करू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो, कुणाची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा..

मी लढतो, मी झगडतो मी धडपडतो, मी अडखळतो, पण मी कधीही माघार घेत नाही.. हाच यशाचा मार्ग आहे..

स्वतःचे आकलन करण्यासाठी दररोज थोडा वेळ देत चला.

एखादी गोष्ट करणे अशक्य आहे हे बोलण्यापेक्षा, ती कशी करायची हे मला माहित नाही परंतु ती कशी करता येईल हे शिकण्याची माझी तयारी आहे हे वाक्य स्वतःला बोला.

Best Positive Quotes in Hindi | पॉझिटिव्ह कोट्स मराठी

बऱ्याचदा तुम्हाला आलेल अपयश हे तुमच्यासाठी फायदेशिर असत कारण ते तुम्हाला शिकवत कि पुढच्यावेळेस तुम्ही काय केल पाहीजे.

सुखाला सोबती हजार येथे, दुख बेवारसापरी बेजार येथे, मनाचे आरसे रोज पुसतो, जरी आंधळ्याचा बाजार येथे…

मोठा माणूस तोच असतो.. जो आपल्या सोबत असणाऱ्या माणसाला छोटा समजतं नाही..!!

अपयशाची भीती बाळगू नका ! तुमचा एक विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो..!

स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो.

अपयश नावाच्या व्याधीवर आत्मविश्वास आणि कठीण परिश्रम हे एक गुणकारी औषध ठरते.

‘जमणार नाही’ असा विचार करण्याऐवजी ‘प्रयत्न करून पाहू’ असा विचार केला तर अशक्य वाटणारी मोठमोठी आव्हाने सुद्धा सोपी होऊन जातात..

मनात विचारांचं वादळ सुरु झालं कि एखादा शांत सुरक्षित एक आडोसा शोधायचा असतो, तिथे काही काळ शांतपणे थांबायचे असते, आणि वादळ शांत होऊन मनावरील मळभ हटल्यावर मग पुढील प्रवासाचा निर्णय घ्यायचा असतो..

ध्येयावर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत रहा, लवकरच यश मिळेल.

लोक तुमच्या मोठमोठ्या स्वप्नांवर हसत आहेत म्हणून स्वप्ने लहान करू नका, ते स्वप्नच तुमच्यासाठी लहान वाटेल इतके यश मिळवून दाखवा.

सहजता सहजासहजी येत नाही.

“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. “

जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडाल तर साध्य करायच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल.

काही माणसं एवढे चांगले स्टेटस ठेवतात की जसे काय आम्हाला त्यांचे कांड माहीतीच नाही..

स्वतः साठी जगायला शिका, इथं कोणी कोणाचं नसतं..

अपयशाला न घाबरता नवनवीन प्रयोग करत रहा, भविष्याचा वेध घ्या, नवनवीन संकल्पनांचा शोध घ्या, गर्दीचा भाग बनण्यापेक्षा गर्दी जमा करणारे बना.

सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात..

चार महिने सहवासात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांवरही जीव जडतो माणसाचा आणि चार वर्ष एकमेकांच्या सहवात राहून सुध्दा माणसं छोट्याश्या कारणांमुळे सहज वेगळी होतात..

यशस्वी होण्यासाठी एका गोष्टीवर Focus करून वाटचाल करणे आवश्यक असते. चंचल वृत्ती नेहमीच घातक ठरते.

शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं…

सततच्या प्रयत्नातूनच काही प्रयत्न तुम्हाला मोठे यश मिळवून देत असतात, आणि बाकीचे प्रयत्न त्या यशाला टिकवून ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतात.

आपण शून्य कितीवेळी झालो हे महत्त्वाचं नाही; आपण पुन्हा नव्याने उभा राहिलो का? हे महत्त्वाचं!

वेळ वाया घालवू नका, वेळेपेक्षा महाग काहीच नाही.

आजही काही निर्णयांवर ठाम राहील्याने पुढचं सर्व सोप्पं होईल, ही आपापली बात प्रत्येकाला माहिती असते.

तुमच्या जीवनाचा आनंद तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.

Positive Status In Marathi | सकारात्मक मराठी स्टेटस

आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम हा रेड सिंगन्ल सारखा असतो, थोडा वेळ वाट पाहिल तर तो हिरवा होत असतो, परीक्षा असते ती संयमाची.

यशस्वी होणं हे एका दिवसाचं काम नाहीये, पण सततच्या प्रयत्नाने एक दिवस यश नक्की मिळतं.

जन्माला आलो त्या परिस्थितीत आणि आज आहे त्या परिस्थितीत एक साम्य आहे. तेव्हाही माहित होतं आणि आताही माहित आहे, एक दिवस आणि एक पर्व आपलं असणार आहे. सोबत कोणी असो किंवा नसो..!

कोणत्याही कामाची चांगली सुरुवात हीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाते.

मनमिळावू स्वभाव लोकांना जोडतो. खंबीर स्वभाव निर्णयक्षमतेसाठी फायद्याचा ठरतो. हसतमुख चेहरा मित्र चांगली प्रतिमा निर्माण करतो.

गुलाब देणारा नाही तर, गुलाबासारख ठेवनारा शोधा.!!

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

पराभव तुम्हाला आणखी परिणामकारकपणे काम करण्यासाठी अनुभव देतात..

यशस्वी होण्यासाठी एक तर आपल्या आवडीचे काम करा किंवा जे काम करत आहात त्यात आवड निर्माण करा बळजबरीने केलेल्या कोणत्याही कामात यश मिळू शकत नाही..

कधी कधी वाईट दिवस येतात ते चांगल्या लोकांशी गाठ भेट व्हावी यासाठी.

स्वप्न पाहणे सोडू नका आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेऊ नका..

नात्याचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर सुरवातीला लबाड वागून चालत नाही …!!

नकारात्मक लोकांपासून दूर रहा, त्यांच्याकडे फक्त प्रश्न आणि नकारात्मक विचार असतात.

चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते.

प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करताना घरी बसून एक यशाची वाट पाहण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं असतं.

चुकलो पण शिकलो हे महत्वाचं ! हरलो पण बहरलो हे महत्वाचं !

सगळं चांगलं असताना सगळेच चांगलं वागत असतात, आपत्तीच्या काळात खरे रंग कळत असतात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका..

लोकांशी उगाचच वाद घालून आपले संबंध आणि प्रतिमा खराब करण्यापेक्षा त्यांचेशी चार शब्द चांगले बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न करा.

समाप्ती.

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण आपल्या आयुष्यात आलेल्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी उत्कृष्ट असे मराठी सकारात्मक सुविचार, positive thoughts in marathi वर आधारीत खुप सारे सुविचार पाहीले.

तरी या positive thoughts म्हणजेच सकारात्मक सुविचारांपैकी तुम्हाला कोणते सुविचार आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇

Leave a Comment