50+ Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले उत्कृष्ट असे सुविचार मराठी

shivaji maharaj jayanti quotes in marathi

Download Image

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा आपल्या कानावर पडत तेव्हा आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.. महाराजांचा इतिहास आजही आपल्या आयुष्यात एक नवीन दिशा दाखवण्याचे काम करतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या मावळ्यांचे बलिदान जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या अंगात एक नवीन उर्जा निर्माण होते.

अशीच अंगात नवीन उर्जा व धाडस निर्माण करणारे खुप सारे विचार आम्ही ह्या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत….

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi


कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
– छत्रपती शिवाजी महाराज

शब्द पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती. राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

पैसा पुढच्या पिढ्यांना देता येतो पण शहाणपण नाही तलवार देतां येते पण शौर्य नाही म्हणूनच ना ४०० वर्षात ऐसे

|| छत्रपती श्री शिवाजी महाराज एकच झाले ||

एक शिव कैलासपती, एक शिव छत्रपती..!!

परिस्थितीशी टक्कर देणे हे शौर्य, तर जुळवाजुळव करणे हे चातुर्य.

ज्या भुतकाळाकडे पाहिलं की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमानदृष्टी प्राप्त होते. असा शौर्याचा इतिहास या मातीत घडवणाऱ्या तेजस्वी सुर्याला मानाचा मुजरा..!

अफजल्याचे उदर फाडता दिल्लीशाही शहारली जावळीतल्या किंकाळ्यांनी आदिलशाही थरारली शिव प्रताप पाहून भैरव दंडपाल ही दचकून गेले शिव शौर्याच्या तेजापुढती शत सुर्य ही दिवून गेले…

🍁 जय शिवराय 🍁

गाजे पराक्रम दर्यापार फिरंगी फार; झाले गप्पगार सागर क्षेत्री, जयिष्णु होते स्वराज्याचे आरमार…

महाराज म्हणजे

डोक्यात घेण्याचा विषय आहे, डोक्यावर घेण्याचा नव्हे…

शिवरायांचे आठवावे स्वरूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।

आपली माणसं मोठी करा
आपण आपोआप मोठे होतो.

शिवराय जिथ असतील तिथे आमुची प्रेतेही जय म्हणतौल !

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे..!

तुमच्यात जर आत्मविश्वास व हिंमत असेल तर मोठ-मोठ्या संकटांना तोंड देवून तुम्ही स्वतःच साम्राज्य उभं करू शकता..!

छञपती म्हणजे भारतभूमीला मिळालेले वरदान..

सृष्टीच्या निर्मिती नंतर जगात सर्वात मोठ्या आश्चर्याचे आणि धाडसाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज

शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो. जेव्हा इरादे मजबूत असतात, तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखा दिसतो.

Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi

जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं, सगळं संपलं असं वाटतं, तेंव्हा मी माझ्या राज्याला डोळ्यासमोर ठेवतो. माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो.

|| शिवराय असे शक्तीदाता ||

जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते..!! प्रेरणास्थान “छत्रपती शिवाजी महाराज

संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरेच युद्ध शांतपणे जिंकता येतात..!

शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांची सलगी देणे । कैसे असे ।।

मुघलांनी बायकोची ईच्छा पूर्ण केली ताजमहाल बांधून माझ्या शिवबांनी आईसाहेबांची ईच्छा पूर्ण केली हिंदवी स्वराज्य स्थापन करून.!

थकलेल्या विचारांना स्फुर्ती देणारे अजरामर विचारवंत म्हणजे
श्रीमंतयोगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज…

आमच्यासाठी वर्षांचा शेवट “छत्रपती शिवराय” पासून आणि नविन वर्षाच्यी सुरुवात पण “छत्रपती शिवराय” पासून..!!

ना चिंता, ना भिती ज्याचा मनात छत्रपतींची निती…

|| जय शिवराय ||

कलम नव्हते, कायदा नव्हता तरिही सुखी होती प्रजा कारण सिंहसनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा.

जय शिवराय

परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षीची तयारी ठेवा.

।। शिव नीती ।।

जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांच रक्त पडले जिथे मावळ्यांच्या घोड्याच्या टापा पोहचल्या, तो मुलुख ‘स्वराज्याचा’ भाग झाला…

ना भुमीच्या तुकड्यासाठी
ना सोन्याच्या सिंहासनासाठी
माझा राजा लढला फक्त
रयतेच्या सुखासाठी..!!

🙏 जय शिवराय 🙏

छत्रपती शिवराय हेच आमच्या आयुष्याचे कर्ता, कर्म आणि क्रियापद..!!

आयुष्याचा प्रवास तर चालूच आहे पण या आयुष्याला प्रेरणा देणार नाव म्हणजे ‘शिवछत्रपती’

Shivaji Maharaj Quotes Images Marathi


chatrapati shivaji maharaj status

भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

वेळ आणि शत्रू कधी बदलेल सांगता येत नाही म्हणून नेहमी तयारीत राहा..

धाडस असं करावं जे जमणार नाही कोणाला अन इतिहास असा रचावा की 33कोटी देवांची फौज झुकावी मुजऱ्याला !

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है ।।

अर्थात

जसा अंधकारावरती सुर्य जसा कंसा वरती श्री कृष्ण तसे म्लेच्छ वंशावरती विनाशकारी शिवराज ‘सिंह’ आहेत…

गुलामीच्या काळ्याकुट्ट अंधारात तुम्ही सूर्य होऊन उगवलात महाराज…!

पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो..!

प्रत्येक श्वासात शिवछत्रपतींचा ध्यास आणि प्रत्येक कृतीत त्यांच्या संस्कारांची आस हीच खरी शिवजयंती..!

जगात भारी १९ फेब्रुवारी !

योग्य व्यक्तींचे विचार डोक्यात असेल तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ येत नाही.

🍁 जय शिवराय 🍁

जोपर्यंत भूतलावर मानवजात अस्तित्वात आहे तोपर्यत या भूमीचे आदर्श छत्रपती शिवराय हेचं आहेत!

श्रीमंतयोगी

काळाच्या अंतापर्यंत प्रत्येक धर्माच्या मनात राज्य करणारा राजा ! छत्रपति शिवाजी महाराज 🙏

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृद्यावर आधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात..

आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परी नावाचा रे अजुनी दरारा !

ज्या पायांना पूर्वीपासून ऊन-वारा-पाऊस-पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही.

।।दैवत छत्रपती।।

शून्यातून सार उभा करणाऱ्यांना उपदेशाची गरज नसते, कितीही पडझड झाली तरी पुन्हा उभा राहायची हिंमत त्यांत असते..

Chatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

जोवर सुर्यकिरणांचा भंडारा या मातीवर उधळत राहील; तोवर या हृदयाच्या पालखीत छत्रपती नावाच वादळ निरंतर घुमत राहील….

🍁 छत्रपती 🍁

आयुष्याची दशा सुधारून दिशा कशी असावी याचे प्रत्येक पावली मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…

सह्याद्रीच्या शिखरावर सजवले स्वराज्य सिंहासन, उपसून तलवार धर्मनिष्ठेची केले हिंदुत्वाचे रक्षण.

ना संघर्ष ना त्रास, मग जगण्यात काय मजा, छातीत आग लागली की मोठ-मोठी वादळे पण शरण येतात..

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लगते.

धर्मो रक्षति रक्षितः

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामध्ये क्षमता असते..

लाख खस्ता खा पण लढत राहा कारण आपण मैदान सोडणाऱ्यांच्या नाही मैदान गाजवणाऱ्यांच्या भूमीत जन्मलो आहे..
🚩 जय शिवराय 🚩

एक मावळा म्हणून मी महाराजांसारखा दिसतो का ? हे बघण्यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वागतो का हे पहा !

राज्य छोटं असलं तरी चालेल, पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरंच जग तुमचा आदर करेल.

🍁 जय शिवराय 🍁

जाती धर्माच्या भिंती भेदून, मानसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य !

जिकत नाही जवर तवर झुंजत राहायचा..!

अवघड आहे, कठीण आहे, म्हणून सोडून दिलं असत तर आज हे स्वराज्य🚩 उभं राहिलं नसत..!

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही, पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला..!

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

उभ्या आयुष्यात एकच ध्यास असूद्या हातात भगवा आणि काळजात शिवबा ..!!

आयुष्यात लढाई कुठलीही असो, जीव गेला तरी चालेल पण रणांगण सोडून पळायचं नाही…!

यशवंत, कीर्तिवंत! सामर्थ्यवंत, वरदवंत! पुण्यवं, नीतिवंत, ।। जाणता राजा ।।

ह्या पोस्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजां वरील जे काही विचार आम्ही घेऊन आलो आहोत ते सर्व विचार सोशल मीडिया व वेगवेगळ्या माध्यमातून घेण्यात आले आहेत.. तरी यात काही सुधारणा करायची गरज असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा…

तसेच छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले तर महाराष्ट्रातील प्रत्येक तरूण मंडळी आप आपल्या भाषेत महाराजांवर काही न काही सुंदर विचार लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करीत असते.

छत्रपती शिवाजी महाराजांवर असेच काही सुंदर विचार तुमच्याकडे असल्यास ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा.. आम्ही त्यांना या पोस्ट मध्ये नक्कीच update करू…

जय शिवराय, जय महाराष्ट्र…. 🚩🚩

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजां वरील हे सुविचार आवडले असल्यास, आपल्या मित्र परिवारालाही शेअर करा. 👇🏻👇🏻

Leave a comment