आपल्या आयुष्यातील जोडीदाराला आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश – birthday wishes for husband in marathi
आपल्या आयुष्यातील जोडीदार, आपल्या सुख, दुःखात नेहमी आपली साथ देणाऱ्या आपल्या पतीचा, नवऱ्याचा वाढदिवस म्हणजे आपल्या साठी खूप आनंदाचा क्षण असतो…
ह्या आनंदच्या वेळी आपण आपल्या जोडीदाराबरोबर काही आनंदाचे क्षण घालवण्याचा व त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस असतो..
ह्या दिवशी आपल्या पतीवरचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेक विचारांची गरज असते. असेच अनेक विचारां सह उत्कृष्ट असे नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत.
Best Birthday Wishes For Husband In Marathi – नवऱ्याला सर्वोत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
- Happy Birthday Dear Husband.. तुझ्या साठी दोन लाईन…
तू कृष्ण बनून येताच क्षणी दरवळली मी राधिका बनूनी मोहक तुझे रूप पाहुनी हरवली सारे जग भुलूनी.. - तू माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहेस. जो मला कधीच गमवायचा नाही. जगातील सर्व सुख जरी माझ्याकडे असेल तरी मला फक्त तुच पाहिजेस… Happy Birthday #नवरोबा
- प्रेम खूप नशिबाने मिळतं आणि मला तु मिळालेलं माझं नशीब आहेस… माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
- आयुष्याचा जोडीदार योग्य असला तर जिवन जगण्याचा आनंद च वगळा असतो.. माझ्या ह्या जोडीदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला #नवरोबा तुम्ही माझे विठ्ठल नि मी तुमची रखुमाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Dear Husband…
तुझ माझं नात हे असच रहावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असाव.!!!!!! - तूझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? नेहमी रहा सोबती आणखी काय हवं… Happy Birthday Dear Husband 🎉
- आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
- आनंद मनी दाटला, वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा, हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा! - आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे. चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे..
पण तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील… एवढे मोठे हृदय मात्र नक्कीच आहे माझे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… #नवरोबा - तू आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे, हे जग जरी नसलं तरी, तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे ……!! #नवरोबा Happy Birthday 🎂
- देवाने दिलेलं सगळ्यात मोठं सुख आहेस तू, आई नंतर खूप प्रेम करणारी पहिली व्यक्ती आहेस तू… Dear पतीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
- तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे.. तुला वजा केल्यास माझे जगणं ही व्यर्थ आहे. अश्या माझ्या आयुष्यात जोडीदाराला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
- माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील… #Hasband तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप शुभेच्छा..
- आई वडिलांच्या नंतर जो आपल्यावर जीवापाड प्रेम करतो तो फक्त आपला नवरा असतो #नवरोबा Happy Birthday To You
- आयुष्य सुदंर तेव्हा वाटू लागते जेव्हा आपली काळजी घेणारी व्यक्ती आपले जवळ असते… जसे की तुम्ही.. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
- कळलंच नाही मला प्रेम तुझ्यावर नक्की कसं झालं, मी फक्त जीव लावला हृदय केव्हाच तुझं झालं… Dear Husband Happy Birthday 🎂🎉
Romantic Birthday Wishes For Husband In Marathi – पतीला मराठीत रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dear Husband… Happy Birthday
ओढ म्हणजे काय जीव लागल्या शिवाय समजत नाही.. विरह म्हणजे काय प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.. प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय समजत नाही…
तू माझ्या आयुष्यात खूप रंग भरले आहेस; मला आशा आहे की तुमचा वाढदिवस तितकाच उत्साही असेल ज्याप्रमाणे तुम्ही आमचे जग बनवले आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सात दिवसांत संपेल एवढे प्रेम नाहीये तुझ्यावर सात जन्म देखील कमी पडेल एवढे प्रेम आहे तुझ्यावर……!! Dear #Husband Happy Birthday…
या जगात मला मनापासून आवडणारी व्यक्ती तू आहेस. आणि तुझ्याशिवाय मला काहीच नको कारण तुझ्यापुढे प्रत्येक गोष्टीची किंमत शून्य आहे… Happy Birthday Dear 🎉
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय पहिल नाही शेवटचं प्रेम तुझ व्हायचंय. Happy Birthday My Dear Love 🎈
आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन नेहमी अतूट रहावे प्रेम आपल्या दोघांमधले नेहमी वाढावे नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे आपण नेहमी आनंदी रहावे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रेम पण अस करायचं की ते arrange आसंल तरी love वाटलं पाहिजे.. #पतीदेव happy birthday Dear 🎉
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नवरोबा तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगायला जमत नाही, पण तुमच्या शिवाय क्षणभर ही मन रमत नाही…
तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला आयुष्यभर प्रेम, हशा आणि अगणित अद्भुत आठवणींचे वचन देऊ इच्छिते. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. नवरोबा
तो कोणता राजा नाही पण मला नेहमीच राणी ठेवण्याचा प्रयत्न करतो… मी लहान नाही पण मला नेहमी लहान मुली सारखं सांभाळतो, आणि माझा पापा सारखं तो पण माझे लाड पुरवतो… Thank You 👍 And Happy Birthday Dear Husband 🥳
शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही आपण दोघे सात जन्मांसाठी या लग्नाच्या बेडीत अडकलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…
प्रत्येक नात्याची गुंतागुंत आणि आव्हाने असतात, परंतु आपले प्रेम आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर मात करण्यासाठी पुरेसे आहे. आपल्यातील प्रेम असेच वाढत राहो… तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सगळ्या गोष्टी Limit मध्ये आवडतात पण तुच एक आहेस की Unlimited आवडतोस.. Happy Birthday Dear Husband 🎉🎁
जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन. पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेन… Happy Birthday Dear #Husband
दिवसाची सुरवात आणि रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा #नवरोबा
Short Birthday Wishes For Husband In Marathi – नवऱ्यासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा…
शिंपल्यांचे शो-पीस नको जीव अडकला मोत्यात.. Dear Husband Happy Birthday 🎂
जगात प्रत्येकाला सुख पाहीजे पण मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक सुखात तू पाहीजे … Dear #Hasband Happy Birthday 🎂
My love… तुमच्या सारखा जोडीदार मिळायला नशीब लागत.. Happy Birthday Dear #नवरोबा
माझ्या हृदयाचा राजा, माझ्या स्वप्नांचा माणूस आणि माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरा खंबीरपने पाठीशी उभा असेल तर बायको यशस्वी झालीच म्हणून समजा… Happy Birthday Dear…
आवड तुम्ही प्रेम तुम्ही आणि शेवट पूर्ण तुम्हीच #नवरोबा Happy Birthday 🎂
प्रेम हे देखणं असतं, पण विरह दुःखण असतं. Dear पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear Husband… आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही..
तुमचा दिवस आनंदाने भरलेला जावो हीच अपेक्षा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🥳
आणखी एक वर्ष जुने, आणखी एक वर्ष तुझ्याबरोबर. Happy Birthday नवरोबा..
माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आहों ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🥳
तुम्हाला आनंदाने भरलेल्या दिवसाच्या शुभेच्छा.
माझे आयुष्य आश्चर्य, आनंद आणि अंतहीन प्रेमाने भरणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमचा दिवस तुमच्या स्मितहास्यासारखा उज्ज्वल होवो.
तुझा वाढदिवस तितकाच खास असू दे ज्याप्रमाणे तू मला दररोज अनुभवतोस.
केक खा आणि तुमचा दिवस एन्जॉय करा.
ज्याने माझे हृदय चोरले आणि ते कधीही परत दिले नाही अशा माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझ्याबरोबर म्हातारपण ही माझी इच्छा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुमच्या खास दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. Happy Birthday Dear 🎉
आणखी एक वर्ष मोठे, माझे हृदय चोरण्याचे आणखी एक वर्ष. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला प्रेमाने भरलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍁
माझ्याकडून केक, मेणबत्त्या आणि मिठी या तीन गोष्टींनी भरलेल्या वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा!
सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही अप्रतिम आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला आणखी एका वर्षासाठी शुभेच्छा!
प्रत्येक प्रेमकथा खास असते, पण आमची माझी आवडती आहे. माझ्या जीवनसाथीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आजही मला रोज फुलपाखरे देणाऱ्या माणसाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची श्रीमंती,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏
आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नवरा प्रियकर असला तर आयुष्याच सोन होत… आणि प्रियकरच नवरा असला तर सोन्याहून पिवळ….. Happy Birthday #प्रियकर #Husband
मरण आलं तरी चालेल… पण तुझा धरलेला हात आणि साथ कधीच नाही सोडणार… Dear पती देवांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…
आयुष्य कस पण असू दे पण मी खुश आहे कारण माझ्या सोबत तु आहेस.. Happy Birthday Dear Husband 🥳🎈
Happy Birthday Dear नवरोबा…
तू माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहेस जो मला कधीच गमवायचा नाही… जगातील सर्व सुख जरी माझ्याकडे असले तरी मला फक्त तुच पाहिजेस !!
माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुमच्यापासून सुरू होतात.. आणि तुमच्यातचं संपतात.. Happy Birthday अहो..
तुमचा वाढदिवस आपन भेटलो त्या दिवसाप्रमाणेच छान असू जावो. तुम्हाला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मला काही बाकी नसलं तरी चालेल पण तुझी साथ आयुष्यभरासाठी हवीये..!! तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा #नवरोबा
तुझ्या प्रेमाने मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातील सर्वात महान शिक्षक.
हे असेच एकमेकांना साथ देत, खाच खळग्यामधून वाट काढत… कधी अडखळत तर कधी हसत खेळत आपल्याला आयुष्यभर सोबत रहायचं आहे … आत्ता पर्यंतचा (…, वर्ष) प्रवास खूपचं छान गेलेत. आणि पूढचा प्रवास देखील असाच छान करायचा आहे. आणि हो एक राहिले च तूमच्या प्रत्येक वाटेच्या वळनावर मी तूमच्या सोबत असेल… Dear Husband तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…
एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो जीवन आपले, तुमच्या जीवनात कायम सुख राहो. प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन देतच राहू.. लव्ह यू अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमचा वाढदिवस तुम्हाला आनंद देणाऱ्या सर्व गोष्टींनी भरलेला जावो आणि येणारे वर्ष तुम्हाला यश, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
या सतत बदलणाऱ्या जगात तू माझा अँकर आहेस. मला स्थिर ठेवणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नानंतर लाईफ सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द फार छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर Best बनले आहे….. एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टीची सुरुवात आणि शेवट तुमच्या नावाने होतो… माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान नेहमी विशेष राहील.. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा…
जेव्हा तुम्ही तुमच्या केकवरील मेणबत्त्या विझवता, तेव्हा लक्षात ठेवा की माझे तुमच्यावरील प्रेम कोणत्याही ज्योतीपेक्षा अधिक तेजस्वी आहे.
Happy Birthday Husband
ऐका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर हक्काची व्यक्ती म्हणजे तिचा नवराच असतो…! Happy Birthday Dear Husband 🎉 #नवरोबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा – Happy Birthday Navroba In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Dear Husband…
तुम्हाला पहिल्यांदा बघुन मला कधी असं वाटलच नाही की तुम्ही माझ्या आयुष्यातील एक विशेष अस सुंदर भाग बनताल.. Happy Birthday Again
तुमच्या वाढदिवशी, मला एवढेच सांगायचे आहे की मी माझे आयुष्य तुमच्यासोबत शेअर करण्यात धन्यता मानते. Happy Birthday Dear Husband 🥳
आज तुझ्या आयुष्यातील आणखी एक वर्ष आहे, पण मला तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस आयुष्यभर आनंदाचा वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय.
माझ्या केसांत माळलेला गजरा त्याच्या हातांची वाट पाहतो, माझ्या नावाचं आयुष्य त्याचं, तो मात्र माझ्यासाठीच जगत असतो..
Happy Birthday Dear #Love #Husband
मी दररोज देवाकडे एकच प्रार्थना करते की
माझा नवरा बुद्धू आणि जाडा होऊ दे
म्हणजे इतर मुली त्याच्याकडे पाहणे बंद करतील.
अशा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमची बुद्धी आणि प्रेम प्रत्येक दिवसाला आशीर्वाद देते. माझ्या शहाण्या आणि प्रेमळ पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.🎉
तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे, आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येने हे त्याहून कठीण आहे. Dear Husband वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
टेन्शन घेऊ नको कुठल्याही परिस्थिती मध्ये तुझा पकडलेला हात सोडणार नाही..!!! पती देवांना वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा…
कधी नको काही तुझ्या कडून फक्त तुझी साथ हवी, तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे…! Happy Birthday Dear #नवरोबा #आहो
पृथ्वीवरील सर्वात दयाळू, प्रेमळ, देखणा आणि अस्सल व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
राहावे तुमचे माझे प्रेम जन्मोजन्मी ! भेटण्याची उत्सुकता होती आल्यावर माझी असेच सगळी स्वप्न पूर्ण झाली माझ प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही… वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आहो.. 🎁
सुखाचे अनेक भागीदार भेटतील पण दुःखाचा एक साक्षीदार भेटायला माणूस नशीबवान लागतो.. अशा माझ्या आयुष्यातील भागीदाराला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… 🎉
तुझ्या वाढदिवशी, तू फक्त माझे पती नाहीस हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे; तुम्ही माझ्या आनंदाचे शिल्पकार आहात आणि माझे हृदय गाण्याचे कारण आहात.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता – Birthday Wishes Kavita For Husband In Marathi
कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा!…
अबोल तू, अस्वस्थ मी..
अक्षर तू, शब्द मी..
समोर तू, आनंदी मी..
सोबत तू, संपूर्ण मी..Happy Birthday Dear.. Love #Husband
न सांगताच तुला कसे उमगते सारे,
कळतात तुला माझ्या मनातील इशारे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो…
तू बरोबर आहे कि नाही हा प्रश्नच कधी नाही पडत
कारण आठवनीतसुद्धा
तू मला नाही सोडत
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..
तुला पाहिलं की असं काही होऊन जातं
माझं मन मला कसा विसरून जातं
तुझ्या डोळ्यात पाहून भान हरवून जातं
तुला घेऊन मन नभात उडून जातं
चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी तुमची प्रेमाची साथ आहे जीवनाला #नवरोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा..
तुला बोलावसं वाटलं तरच बोलणार
आणि बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार
प्रत्येक गोष्ट तू तुझ्याच मर्जीप्रमाणे करणार
पण मला हि एक मन आहे
याचा विचार तू कधी करणार ?
असो तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
तू जवळ असलास की वाटते हे क्षण न सरावे
तुझ्या डोळ्यांमध्ये हरवून तुझ्या कुशीमध्ये शिरावे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
विखुरले मी प्रेम माझे तुझ्या सर्वच त्या वाटांवरती
लहरू दे बोट तुझ्याही भावनांची स्वैर
खवळलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो…
का करतेस काळजी..? आहे ना मी… म्हणून किती धीर देतो.
अडचणी सगळ्या आपल्या मनात ठेऊन बायको कडे हासऱ्या नजरेने बघतो.. नवरा तो नवराच असतो… अश्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
जिथे तू असणार
तिथेच मी दिसणार
तूच माझ्या जगण्याची सुरुवात
आणि तूच माझ्या जगण्याची शेवट असणार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो…
तुझ्यावर मनापासून प्रेम करतेय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतेय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू, माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.
Happy Birthday Dear Husband 🎁
तुझ्या कुंकवाशी माझं नात जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं, कितीही सकंटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्युलाही जवळ करताना.. देह तुझ्या मिठीत असावा. Happy Birthday Dear Husband 🎉
आपल्या पती, नवऱ्या वरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही Emotional Line’s..
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. माझ्या चेहऱ्यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल, मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल. माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #नवरोबा #Husband #नवरा #पतीदेव
इतर काही पोस्ट…
- Anniversary Wishes For Husband In Marathi
- बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश ..
- Thank You For Birthday Wishes In Marathi
सारांश.
अशा प्रकारे आपण ह्या पोस्ट मध्ये आपल्या पतीला, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खुप सारे शुभेच्छा संदेश पाहीले.. तरी यात तुम्ही आपल्या Husband, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते संदेश वापरला आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा…
वरील birthday wishes for husband in marathi म्हणजेच नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..
आणि हो तुमच्याकडे ही काही सुंदर व चांगले शुभेच्छा संदेश तसेच काही इतर विचार असल्यास तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…
धन्यवाद…🙏
आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा ..👇👇👇