100+ Gautam Buddha Quotes in Marathi | गौतम बुद्धांचे विचार

Buddha-Quotes-in-Marathi

Download Image

Gautam Buddha Quotes In Marathi : बुद्धा एक अद्भुत आध्यात्मिक गुरु होते, ज्यांनी आपल्या शिक्षांच्या माध्यमातून मानवतेला मार्गदर्शन केले. त्यांच्या उपदेशांत संतता, समता, आणि शांतता यांचे मूल्ये आहेत. गौतम बुद्ध आत्मविश्वास, समर्थन, आणि त्याच्या सुसंस्कृत जीवनानंतर सुधारित होऊन, सर्वांत सुखी जीवनसाठी मार्गदर्शन करतात.

त्याच्या उपदेशांमुळे, मानव जीवनात एकात्मता आणि सामंजस्य असण्याची महत्त्वाकांक्षा मिळाली. बुद्धाच्या बोधिसत्त्वाची उपासना अनेकांना उद्दीपन, संजीवनी, आणि आध्यात्मिक संजीवनी साधू शकते.

अशा गौतम बुद्धांवर आधारित व त्यांचे विचार आपण आज या पोस्ट मध्ये पहाणार आहोत.

Gautam Buddha Quotes in Marathi

भुतकाळा चा जास्त विचार करू नका, डोळ्यात पाणी येईल, भविष्याची ही काळजी करू नका, मनात समस्या निर्माण होतील पण.. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसत सामोरे गेलात तर.. जिवनात आनंद निर्माण होईल..!

जे स्वतःबलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.

माणसे घर बदलतात, कपड़े राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात कारण ते स्वतः बदलत नाही..

आधी स्वतःवर विजय प्राप्त करा मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरिही विजय नेहमी तुमचाच होईल…

बुद्धाची सांगतं म्हणजेच संतता, समता, आणि शांततेची अद्भुत साकारात्मकता.

 👇👇 हे देखील वाचा 👇👇 
स्वामी विवेकानंद कोट्स | Swami Vivekananda Quotes, Thoughts in Marathi
अब्दुल कलाम यांचे सुविचार मराठी | Dr. APJ Abdul Kalam Quotes In Marathi
50+ Best Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

बुध्दांना जेव्हा विचारले “ध्यानाने तुम्हाला काय मिळाले” तेव्हा ते म्हणाले “मला मिळाले काहीच नाही पण राग, मत्सर, उदासिनता, असुरक्षितता, वृध्दत्व आणि मृत्यूचे भय मात्र मी गमावले”

जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.

“शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही”

“तुम्ही वादळाला शांत करु शकत नाही, प्रयत्न करणे व्यर्थ आहे, तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ स्वतःहून निघून जाईल.”

बुद्ध शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघ शरणं गच्छामि। बुद्ध शरणं गच्छामि।

यशस्वी व्हा

भूतकाळातून शिका,
भविष्याचा वेध घ्या.
चुकांतून बोध घ्या,
स्वतःत आवश्यक सुधारणा करा.
उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा,
आत्मविश्वासाने उद्दिष्टपूर्तीकडे मार्गक्रमण करा.

एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

lord buddha quotes in marathi

कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते.

गौतम बुद्ध

वाचनाने माणूस समृद्ध होतो, विनम्र होतो आणि विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे.

जसे फुलांच्या राशीतून अनेक माळा करतात, तसेच जीवीत मनुष्याने आयुष्यात अनेक पुण्यकर्मे करावीत! – भगवान बुद्ध !

मनाचे क्रोधापासून रक्षण करा, मन संयमित ठेवा! मन दुराचारी नको, मन सदाचारी असावे!

मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मंनप्रधान, मनोमय आहेत. जसे कोणी दूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, तसे दुःख त्याच्यामागे लागते जसे वाहन ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागे चाक लागतात.

नमन आहे त्या बुद्धांना जे सर्व गोटींपासून विरक्त आहेत, मुक्त आहेत योग्य मार्गावर आरूढ आहेत त्यांना मी शरण जाती..

” ‘मी तसा बनू शकत नाही.’ असे म्हणत चांगुलपणाला हलक्यात घेऊ नका. थेंब थेंब पाण्यानेच पात्र भरतं आणि तसेच ज्ञानी व्यक्ती थोडं थोडं करत स्वतःला चांगुलपणाने भरतात.”

सन्मार्गावर जर तुम्हाला स्वतःसारखा किंवा स्वतःहून श्रेष्ठ असा सहप्रवासी नाही मिळाला तर ठामपणे एकटे चालावे, पण अज्ञानींच्या संगतीत जाऊ नये!

“जसा मी आहे, तसेच इतर आहेत; इतर जसे आहेत तसा मीही आहे. स्वतःला व इतरांना अश्या प्रकारे जाणल्यावर, कुणालाही इजा करू नये किंवा होऊ देऊ नये.”

क्रोधाला प्रेमाने जिंका, पापाला पुण्याने जिंका, कंजूसाला दानाने जिंका आणि असत्याला सत्याने जिंका!

inspirational buddha quotes in marathi

कृतीवीना बोललेले गोड शब्द हे त्या फुलांसारखे असतात ज्यांना रंग तर आहे पण गंध नाही!

जसा सोसाट्याचा वारा निश्चल पर्वताला हलवू शकत नाही, त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य निंदा किंवा प्रशंसेने प्रभावित होत नाही !!

खूप बोलतो म्हणून कोणी ज्ञानी होत नाही… जो क्षमाशील, अवैरी आणि निर्भय असतो तो खरा ज्ञानी!!

हजारो अर्थहीन गाथांपेक्षा अर्थपूर्ण गाथेचं एक पद श्रेयस्कर जे ऐकून शांती मिळते !

सर्व भौतिक गोष्टी ह्या अनित्य (नाशवंत) आहेत – हे जो प्रज्ञेने पहातो तो दुःखाचा नाश करतो आणि हाच विशुद्धीचा मार्ग आहे!!

अश्या प्रकारची वाणी बोला की ज्याने ना स्वतःला यातना होईल ना ही दुसऱ्यांना! ह्या प्रकारची वाणी योग्य आहे…

आरोग्य हे अत्यंत लाभदायी, संतुष्टी हेच सर्वोत्तम धन, विश्वास हाच उत्तम नातेवाईक निर्वाण श्रेष्ठ सुख..!!

युध्दात लाखो लोकांना जिंकणाऱ्यापेक्षा, स्वतःला जिंकणारा जास्त श्रेष्ठ असतो!
-भगवान बुद्ध

“जे फुलांनी, सुगंधी द्रव्यांनी आणि धूपेने माझी पूजा करतात ते खऱ्या अर्थाने मला वंदन करत नाहीत. तर जे धम्म आचरणात आणतात केवळ ते मला खऱ्या अर्थाने वंदन करतात.”

“मी पाण्याने तुमची पापं धुवू शकत नाही. दुःख माझ्या हातांनी दूर करू शकत नाही. माझी अनुभूती मी तुम्हांला हस्तांतरित करू शकत नाही. तुम्हांला (माझी) शिकवण देऊन केवळ मी तुमची मदत करू शकतो. तुमच्या विमुक्तीसाठी तुम्ही स्वतःच प्रयत्न करायला हवेत.”

buddha quotes on life

कुणाशीही कठोर बोलू नये, त्याचे प्रत्युत्तर कठोरच मिळते. वादग्रस्त वक्तव्य करणं दुःखदायक आहे त्याने तुम्ही दंडासच पात्र व्हाल !

जो शुद्ध मनाने बोलतो किंवा कर्म करतो, त्याच्या मागे सुख सावलीसारखे येते!

दुराचारी मित्राची संगत नको, अधम माणसाची संगत नको, कल्याणकारी मित्राची संगत करावी, उत्तम माणसाची संगत करावी!!

हे शरीर मातीच्या घड्याप्रमाणे नाजूक समजून, चित्ताला कडेकोट बंदोबस्त असलेल्या नगराप्रमाणे ठेवून प्रज्ञारुपी शस्त्राने माराशी युद्ध करावे, आणि जे जिंकाल त्याचे रक्षण करून अनासक्त रहावे.

कोणी मागत असेल तर द्यावे, जरी तुमच्याकडे कमी असेल तरीही!

आपणाला मिळालेले आयुष्य, जे कमी असेल, जास्त असेल, ते सुंदरपणे जगता आले पाहिजे. तरच मृत्यूला तटस्थपणे सामोरे जाता येईल.

पाऊस नीतिमान आणि अन्यायकारकांवर सारखाच पडतो म्हणून, आपल्या मनावर न्यायाचे ओझे लावू नका तर सर्वांवर समानतेचा वर्षाव करा. – गौतम बुद्ध

केवळ मनाला वाटते म्हणूनच माणूस वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केल तर सर्व वाईट काम संपतील.

ताकद हवी असेल तर ज्ञान मिळवा आणि सन्मान हवा असेल तर चरित्र स्वच्छ ठेवा.

ज्याप्रमाणे सोनार चांदीचा गंज दूर करतो त्याप्रमाणे एक एक करून, थोडं थोडं करून, क्षणाक्षणाने, ज्ञानी मनुष्याने त्याची अशुद्धी (विकार) दूर केले पाहिजेत.

जो शुद्ध मनाने बोलतो किंवा कर्म करतो, त्याच्या मागे सुख सावलीसारखे येते!

buddha quotes on karma

रागामध्ये हजारी शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्ठीमुळे जीवनात शांती निर्माण होते.

तुम्ही एकाकी आहात पण एकटे नाही. तुमचा मेंदू जितका शांत असेल तितकी अंतर्दृष्टी सखोल होईल. कोणत्याही संघर्षाशिवाय व्यवस्थित सुसंवाद साधण्यासाठी मेंदूला सुरक्षिततेची आणि सुव्यवस्थेची आवश्यकता असते.

अहंकार व गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टी पासून दूर राहतो..कारण, गैरसमज सत्य ऐकू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही…

जशी मिठा शिवाय भाजीला चव येत नाही तसं बुध्दाच्या विचाराशिवाय जीवनाला दिशा येत नाही..!

सत्याच्या मार्गावर चालताना तुम्ही दोनच चुका करू शकता; पूर्ण रस्ता न चालणं किंवा त्यावर चालण्याची सुरुवातच न करणं.

स्वतः शिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.

buddha quotes on love

मनाला शांत केल्यावर कुठल्याही समस्येचे उत्तर सापडते.

भटकून भटकून जग हारलो संकटात दिली नाही कोणीच आमची साथ जेव्हा बाबांनी दाखवली आम्हाला बुद्धाकडे जाण्याची वाट तेव्हा कुठे मग आलो आम्ही माणसात…!

पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात…!!

क्रोधाने गजबजलेल्या या जगात तुझे विचार अजूनही आम्हाला शांत राहण्यास प्रेरित करतात तथागता..!

पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुप विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही माल शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.

“तुम्ही कधीही एकटे नसता. अध्यात्माने तुम्हाला गुरुदेवांची उपस्थिती अनुभवण्यास शिकवले पाहिजे, म्हणजे तुम्हाला एकाकीपणा जाणवणार नाही.”

फार बोलतो एवढ्यावरून कोणीही ज्ञानी ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच ज्ञानी होय.

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही…. त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात… म्हणून नेहमी सकारात्मक रहा…

“अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.”

राग कवटाळून धरणे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.

कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते.

“वरील Gautam Buddha Quotes in Marathi म्हणजेच गौतम बुद्धांचे अनमोल विचारांपैकी तुम्हाला कोणते विचार आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही चांगले विचार संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे विचार आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇

Leave a Comment